अंकशास्त्र 11 या अंकाला 'मास्टर नंबर' मानते. हा अंक तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकून योग्य निर्णय घ्यायला मदत करतो. पण विज्ञान आणि मानसशास्त्र याला 'फ्रीक्वेन्सी इल्युजन' (बाडर-मेनहॉफ फेनोमेनन) असं म्हणतात.
तुम्ही घड्याळात पाहता आणि तिथे 11:11 वाजलेले असतात. किंवा मोबाईल नंबर, गाड्यांच्या नंबर प्लेटवर हाच आकडा तुम्हाला वारंवार दिसतो. हा फक्त योगायोग नाहीये. जगभरातले अनेक लोक याला 'एंजल नंबर' (Angel Number) मानतात. देवदूत आणि हे ब्रह्मांड तुम्हाला यातून काहीतरी आध्यात्मिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा याचा अर्थ होतो. याला कोणताही वैज्ञानिक आधार नसला तरी, अंकशास्त्र (Numerology) आणि अध्यात्मात 11:11 या अंकाला खूप महत्त्व आहे.
25
आयुष्याची एक नवी सुरुवात
11:11 हा आकडा दिसण्याचा सर्वात सोपा अर्थ म्हणजे तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. तुम्ही नवीन नोकरी सुरू करत असाल, नवीन घरात राहायला जात असाल किंवा नव्या नात्यात पाऊल ठेवत असाल, तेव्हा हा अंक तुम्हाला वारंवार दिसू शकतो. 11:11 हा अंक तुम्हाला तुमचे विचार नेहमी सकारात्मक ठेवण्याची आठवण करून देतो. अध्यात्म सांगतं की, सकारात्मक विचार तुम्हाला नेहमी उत्साही ठेवतात आणि आयुष्यातल्या नव्या संधी तुमच्याकडे खेचून आणतात.
35
इच्छा पूर्ण करण्याची वेळ (Manifestation)
अंकशास्त्रानुसार, 11:11 हा आकडा 'मॅनिफेस्टेशन' (Manifestation) म्हणजेच 'लॉ ऑफ अट्रॅक्शन'शी जोडलेला आहे. अनेक लोक मानतात की, तुमची ध्येयं ठरवण्यासाठी, एखादी चांगली इच्छा मनात बाळगण्यासाठी किंवा यशाचं चित्र डोळ्यांसमोर उभं करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असते. रोजच्या धावपळीतून थोडा वेळ थांबून स्वतःचा विचार करण्याची संधी हा अंक तुम्हाला देतो. तुम्ही योग्य मार्गावर आहात का आणि तुम्हाला नक्की काय मिळवायचं आहे, हे तपासून पाहण्याची आठवण हा अंक करून देतो.
45
आध्यात्मिक जागृती आणि 'मास्टर नंबर'
अंकशास्त्र 11 या अंकाला 'मास्टर नंबर' (Master Number) मानतं. त्यामुळे 11:11 हा आकडा माणसाचा वैयक्तिक विकास आणि आध्यात्मिक जागृतीशी जवळून जोडलेला आहे. तुम्ही आयुष्यात एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या टप्प्यावर असाल आणि तुम्हाला 11:11 हा आकडा दिसला, तर तुम्ही तुमच्या अंतर्मनावर (Intuition) पूर्ण विश्वास ठेवायला हवा, असं अध्यात्म सांगतं. बाहेरचा गोंधळ विसरून स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला हा अंक तुम्हाला शिकवतो.
55
मानसशास्त्रज्ञ याबद्दल काय सांगतात?
मानसशास्त्रज्ञ यामागील वैज्ञानिक आणि मानसिक सत्य वेगळ्या पद्धतीने सांगतात. 11:11 हा आकडा वारंवार दिसण्याला विज्ञान 'फ्रीक्वेन्सी इल्युजन' (Frequency Illusion) किंवा 'बाडर-मेनहॉफ फेनोमेनन' (Baader-Meinhof phenomenon) असं म्हणतं. जेव्हा आपला मेंदू एखाद्या विशिष्ट अंकावर किंवा गोष्टीवर अचानक जास्त लक्ष केंद्रित करू लागतो, तेव्हा ती गोष्ट आपल्याला नेहमीपेक्षा जास्त दिसू लागते. त्यामुळे तोच अंक आपल्याला सगळीकडे दिसतोय, असा एक भास आपला मेंदू निर्माण करतो, असं मानसशास्त्रीय अभ्यास सांगतो.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.