Isha Ambani Navratri Look : 10 कारागीर, 90 दिवस आणि 2 हजार तास; ईशा अंबानीच्या लेहेंग्याची खास गोष्ट

Published : Oct 17, 2026, 01:47 PM IST

ईशा अंबानीने नवरात्रीसाठी डिझायनर करण तोराणी यांनी तयार केलेला खास लेहेंगा घातला होता. हा लेहेंगा बनवायला तब्बल २,००० तास लागले. यात कलमकारी आणि पट्टचित्र या पारंपरिक भारतीय कलांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

PREV
16
ईशा अंबानीचा लूक

ईशा अंबानीचा नवरात्री लूक सध्या तिच्या लेहेंग्याच्या रंगसंगती आणि अप्रतिम कारागिरीमुळे चर्चेत आहे. तिने घातलेला हा लेहेंगा भारतीय कला, परंपरा आणि राजेशाही थाटाचा उत्तम नमुना आहे. तिने यावर आई नीता अंबानी यांचे दागिने घातले होते. 'स्वदेश' लेबलच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त ईशाने हा रॉयल लूक कॅरी केला होता. हा लेहेंगा तयार करण्यासाठी तब्बल २,००० तास लागले.

26
करण तोराणी डिझाईन

नवरात्रीसाठी ईशा अंबानीने डिझायनर करण तोराणी यांनी 'स्वदेश'च्या सहकार्याने तयार केलेला कस्टम हँड-पेंटेड आणि एम्ब्रॉयडरी केलेला लेहेंगा घातला होता. या ड्रेसमध्ये पारंपरिक भारतीय कला आणि बारकाईने केलेली कारागिरी पाहायला मिळते. डिझायनरच्या मते, नवरात्रीचा उत्साह, गरब्याचे रंग आणि देवीची शक्ती डोळ्यासमोर ठेवून हा लेहेंगा डिझाईन केलाय.

36
आयव्हरी बेस

ईशा अंबानीच्या या लेहेंग्याचा बेस आयव्हरी (हस्तिदंती) रंगाचा असून त्यावर रंगीबेरंगी पारंपरिक चित्रं काढली आहेत. यात राधा-कृष्णाची रासलीला आणि भारतीय संस्कृतीच्या कथा पाहायला मिळतात. शुद्ध रेशमावर कलमकारी आणि ओडिशाची पट्टचित्र कला साकारली आहे. १० कारागिरांनी ९० दिवसांहून अधिक काळ काम करून हा लेहेंगा तयार केलाय. यावर पेंटिंग आणि इतर कामासाठी २,००० पेक्षा जास्त तास लागल्याचं डिझायनरने सांगितलं.

46
रंगीबेरंगी धागे

ईशाने या लेहेंग्यावर रंगीबेरंगी धागे, पारंपरिक डिझाईन्स आणि हेवी एम्ब्रॉयडरी असलेली चोळी घातली आहे. जरी, फ्रेंच नॉट्स, मोती आणि आरशाच्या कामाने या ड्रेसला एक रिच लूक दिलाय. लाल रंगाची ओढणी या आयव्हरी आणि मल्टीकलर लेहेंग्यावर खूपच उठून दिसते. ओढणीच्या बॉर्डरवर चित्रं आहेत आणि काठावर लावलेल्या गोंड्यांमुळे त्याला एक फेस्टिव्ह टच मिळालाय.

56
कलमकारी आर्ट

कलमकारी म्हणजे कापडावर हाताने चित्र काढण्याची कला. यात पेनाचा वापर करून फुले, पाने, देवता आणि पौराणिक कथा रेखाटल्या जातात. यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर होतो. 'कलम' आणि 'कारी' या पर्शियन शब्दांवरून या कलेला नाव मिळालंय. तर पट्टचित्र ही ओडिशाची कला असून यात प्रामुख्याने भगवान जगन्नाथ, श्रीकृष्णाच्या लीला आणि पौराणिक कथा बारीक रेषा आणि गडद रंगात रंगवल्या जातात. 'पट्ट' म्हणजे कापड आणि 'चित्र' म्हणजे पेंटिंग.

66
देसी लूक

ईशाचा हा देसी लूक खूपच सुंदर होता, पण सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते तिच्या हेअरस्टाईलने. तिने मधून भांग पाडून केस अर्धे पिन-अप केले होते आणि त्यावर लाल, निळ्या, पिवळ्या आणि पांढऱ्या फुलांचा गजरा माळला होता. या फुलांमुळे तिच्या लूकला एक छान कलर टच मिळाला, जो लेहेंग्याच्या डिझाईनशी अगदी मॅच होत होता. सोबतच हलका मेकअप आणि छोट्या टिकलीने तिचा हा लूक एकदम परफेक्ट दिसत होता.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories