
उन्हाळा सुरू होताच शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांची मागणी वाढते. त्यात लिंबू सरबत हा सर्वात सोपा, आरोग्यदायी आणि नैसर्गिक उपाय मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, लिंबू सरबत केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक आहे.
गर्मीत घामामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी लिंबू सरबत प्रभावी ठरते. व्हिटॅमिन C आणि इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले हे सरबत शरीराला हायड्रेट ठेवते तसेच उष्णतेपासूनही संरक्षण देते. याशिवाय, लिंबातील अँटीऑक्सिडंट त्वचेसाठी फायदेशीर ठरतात, पचनक्रिया सुधारतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात.
उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्सऐवजी घरगुती लिंबू सरबत निवडणे हा एक उत्तम पर्याय आहे, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे या उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी लिंबू सरबताचा समावेश करा आणि निरोगी राहा!