Limbu Mirchi : आपण भारतीय घरांच्या आणि दुकानांच्या दारावर लिंबू-मिरची लटकवलेली नेहमीच पाहतो. पण ही जुनी परंपरा फक्त धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नाही, तर यामागे काही ठोस वैज्ञानिक कारणंही आहेत.
शतकानुशतके भारतीय लोक आपल्या घराबाहेर किंवा दुकानाबाहेर लिंबू आणि सात मिरच्या लटकवण्याची परंपरा पाळत आहेत. आजही हे चित्र सगळीकडे दिसतं. अनेकजण याला एक संरक्षक कवच मानतात, तर काहीजण याला फक्त अंधश्रद्धा म्हणतात. पण या प्रथेमागील खरं कारण काय आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ही परंपरा म्हणजे काहीतरी साधी युक्ती नाही, तर तिची मुळं अध्यात्मिक श्रद्धा आणि जुन्या वैज्ञानिक तर्कामध्ये खोलवर रुजलेली आहेत. चला, जाणून घेऊया की ही प्रथा आपल्या समाजात इतकी का रुजली आहे.
25
वाईट शक्तींपासून बचाव करण्यासाठी
'माझ्या चांगल्या चाललेल्या व्यवसायाला कोणाची तरी नजर लागली आणि आता सगळंच बिघडत चाललंय,' असं लोक बोलताना तुम्ही ऐकलं असेल. यालाच आपण 'दृष्ट लागणं' म्हणतो. यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लोक आपल्या घरांवर आणि दुकानांवर लिंबू-मिरची लावतात. अशी श्रद्धा आहे की लिंबू सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो, तर मिरच्या नकारात्मक विचार आणि मत्सर जाळून टाकतात. त्यामुळे, ज्या घराबाहेर लिंबू-मिरची लटकवलेली असते, ते घर दृष्ट लागण्यापासून सुरक्षित राहतं असं मानलं जातं. जेव्हा हा गुच्छ हळूहळू सुकतो आणि काळा पडतो, तेव्हा त्याने घरावर येणारी सर्व संकटं आणि वाईट शक्ती शोषून घेतल्या आहेत, असं मानलं जातं.
35
वास्तूशास्रातील एक सोपा उपाय
मुख्य दरवाजाबाहेर लिंबू-मिरची लटकवल्याने घरातील वातावरण शुद्ध राहतं आणि वास्तुदोष दूर होण्यास मदत होते, अशीही एक मान्यता आहे. लिंबू-मिरची घरातील नकारात्मकता दूर ठेवते आणि वाईट शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून रोखते. यामुळे घरात समृद्धी आणि आनंद टिकून राहतो, तर सर्व वाईट गोष्टी बाहेरच राहतात.
जुने काळात कीटक दूर ठेवण्यासाठी आजच्यासारखे फॅन्सी रिपेलेंट स्प्रे नव्हते. तसेच, बहुतेक घरं 'कच्ची' म्हणजे मातीची होती, ज्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव जास्त होता. या समस्येवर उपाय म्हणून लोक लिंबू आणि मिरच्या लटकवत असत. लिंबाचा तीव्र वास आणि मिरचीचा तिखटपणा कीटकांना दूर ठेवतो. त्यामुळे, हे एक प्रकारे नैसर्गिक, घरगुती कीटकनाशक म्हणून काम करायचं.
55
लिंबू मिरची कधी बदलावी?
परंपरेनुसार, हा लिंबू-मिरचीचा गुच्छ आठवड्यातून एकदा, सहसा शनिवारी बदलावा. लोकांचा असा विश्वास आहे की जुन्या गुच्छात गेल्या आठवड्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा अडकलेली असते. त्यामुळे, नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यासाठी, प्रत्येक आठवड्याला तो बदलून नवीन लावणं आवश्यक आहे.