लग्नातल्या किंवा सणासुदीच्या जड सिल्क साड्या घरी कशा धुवायच्या, याचं टेन्शन आलंय का? साडीचा रंग आणि कापड खराब न होता ती घरीच धुण्याच्या आणि इस्त्री करण्याच्या सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
महागड्या सिल्क साड्या घरी धुतल्या तर त्यांचा रंग किंवा कापड खराब होईल, या भीतीने अनेक जण ड्राय क्लिनिंगवर शेकडो रुपये खर्च करतात. पण तुम्ही स्वयंपाकघरातील खडे मीठ आणि १-२ रुपयांचा शॅम्पू वापरून तुमची सिल्क साडी सुरक्षितपणे धुऊ शकता. यामुळे साडी अगदी नवीन दिसते.
26
पहिली पायरी: रंग टिकवण्यासाठी मिठाचे पाणी
एका बादलीत पाव भाग थंड पाणी घ्या आणि त्यात १-२ चमचे खडे मीठ विरघळवून घ्या. या मिठाच्या पाण्यात साडी फक्त २ ते ३ मिनिटे भिजत ठेवा. साडी जास्त वेळ पाण्यात ठेवू नका. मिठामुळे सिल्कचा रंग पक्का राहतो आणि तो इतर भागांवर पसरत नाही. यानंतर साडी लगेच पाण्याबाहेर काढा.
36
दुसरी पायरी: शॅम्पूने हलक्या हाताने धुवा
दुसऱ्या एका बादलीत माईल्ड शॅम्पू किंवा बेबी शॅम्पू पाण्यात फेस येईपर्यंत मिसळा. कपडे धुण्याचा साबण किंवा पावडर अजिबात वापरू नका. या शॅम्पूच्या पाण्यात साडी २ ते ३ वेळा हलक्या हाताने बुडवा. साडी हाताने जास्त घासू नका किंवा घट्ट पिळू नका. शॅम्पूचा फेस काढण्यासाठी साडी २ ते ३ वेळा स्वच्छ थंड पाण्यातून काढा.
साडी शेवटची पाण्यातून काढताना स्वच्छ पाण्यात अर्धा चमचा हेअर कंडिशनर मिसळा. या पाण्यात साडी फक्त एकदा बुडवा आणि बाहेर काढा. कंडिशनरमुळे सिल्कचे धागे सुरक्षित राहतात. तसेच साडी कडक न होता मऊ आणि चमकदार राहते.
56
चौथी पायरी: साडी वाळवण्याची योग्य पद्धत
साडीतलं जास्तीचं पाणी काढण्यासाठी ती कधीही पिळू नका. पाणी नैसर्गिकरित्या गळू द्या. साडी हँगरवर किंवा दोरीवर टाका आणि ती फक्त सावलीतच वाळवा. थेट सूर्यप्रकाशामुळे सिल्कच्या कापडाची नैसर्गिक चमक कमी होते.
66
सिल्क साडीला इस्त्री कशी करावी
साडीला इस्त्री करण्यापूर्वी तिची चार पदरी घडी घाला आणि त्यावर एक पातळ पांढरे सुती कापड ठेवा. तुमच्या इस्त्रीचे तापमान 'सिल्क' किंवा कमी हिट मोडवर सेट करा. साडीला उलट्या बाजूने इस्त्री केल्यास तुम्हाला सर्वोत्तम रिझल्ट मिळेल.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.