तिळाचे मऊ लाडू घरच्या घरी कसे बनवावे, हि रेसिपी करून पहा ट्राय

Published : Nov 26, 2025, 02:30 PM IST

हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारे पौष्टिक तिळाचे लाडू घरच्या घरी सहज बनवता येतात. या लेखात तिळ भाजण्यापासून ते गुळाचा पाक करून लाडू वळण्यापर्यंतची संपूर्ण सोपी कृती दिली आहे. हे लाडू हवाबंद डब्यात १०-१२ दिवस चांगले टिकतात.

PREV
19
तिळाचे मऊ लाडू घरच्या घरी कसे बनवावे, हि रेसिपी करून पहा ट्राय

तिळाचे लाडू घरच्या घरी आपण सहजपणे बनवू शकता. त्यासाठीची रेसिपी आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात तिळाचे लाडू घरच्या घरी कसे बनवावेत ते जाणून घेऊयात.

29
साहित्य

पांढरे किंवा काळे तिळ — 1 कप, गूळ — ¾ कप, तूप — 2 चमचे, वेलची पूड — ½ चमचा, सुकामेवा 

39
तिळ भाजणे

तिळ मंद गॅसवर हलकेसे भाजून घ्या. तीळ फुगू लागले की समजून घ्या भाजून झाले. नंतर ते थंड होऊ द्या.

49
तिळ वाटून घेणे

भाजलेले तिळ मिक्सरमध्ये थोडेच फिरवा. पूर्ण पेस्ट करू नका — जाडसर मिश्रण ठेवले की लाडू मऊ लागतात.

59
गूळ पाक तयार करणे

कढईत 1–2 चमचे पाणी घाला. गूळ टाकून मंद गॅसवर वितळू द्या. एकसंध गूळ पाक तयार करा.

69
तूप आणि वेलची

गूळ पाकात तूप आणि वेलची पूड घाला. चांगलं ढवळा. यामुळे सुगंध आणि मऊपणा वाढतो.

79
तिळ आणि पाक एकत्र करणे

गॅस बंद करा. तिळाचे मिश्रण पाकात घाला. हाताने हलकेसे मळून एकत्र करा.

89
लाडू वळणे

मिश्रण कोमट असताना लाडू वळायला सुरुवात करा. गरम असताना वळले तर लाडू मऊ आणि परफेक्ट तयार होतात.

99
साठवणूक

हे लाडू हवाबंद डब्यात 10–12 दिवस उत्तम टिकतात. तिळ व गुळामुळे हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळते!

Read more Photos on

Recommended Stories