
Bhature Hacks : भटूरे हा उत्तर भारतातील अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट असा पदार्थ. अनेक जण भटूरे घरी बनवतात, पण ते हॉटेलसारखे मऊ, फुललेले आणि स्पंजी होत नाहीत. खरे रहस्य लपलेले असते भटूर्याच्या पिठात मिसळल्या जाणाऱ्या घटकात रवा पीठात थोडीशी रवा घातल्याने भटूरे अप्रतिम मऊ, लुसलुशीत आणि कुरकुरीतपणा न गमावता फुलून येतात.
भटूरे बनवताना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पीठाची योग्य मिक्सिंग. सामान्यतः भटूर्यासाठी मैदा, दही, साखर, मीठ, तेल आणि बेकिंग सोडा वापरतात. या साहित्याच्या योग्य प्रमाणामुळे भटूर्याला हवा तसा टेक्स्चर मिळतो. परंतु या सर्व साहित्यामध्ये १-२ टेबलस्पून रवा मिसळली तर पीठ अधिक चांगले सेट होते आणि तळताना भटूरे फुटत नाहीत.
सूजीचा टेक्स्चर किंचित दाणेदार असतो. ती भटूर्याच्या पिठात मिसळल्यावर, पाणी शोषून घेते आणि पीठाला योग्य बांधणी देते. त्यामुळे भटूरे तळताना हवा आत अडकते आणि भटूरे फुलून येतात. शिवाय भटूरे तळल्यावर लगेचच सुकत नाहीत किंवा कडक होत नाहीत. सूजीमुळे ते लवकर थंड झाले तरीही मऊसरच राहतात. हा उपाय हॉटेलमध्येही वापरला जातो.
पीठ मऊसर व्हावे यासाठी कोमट पाणी किंवा दही वापरून पीठ मळणे हे महत्त्वाचे. दहीमुळे नैसर्गिक आंबवण प्रक्रिया होते आणि भटूरे अधिक फुलून येतात. पीठात १ टेबलस्पून तेल घालल्यास लवचिकता वाढते. सूजी मिसळल्यानंतर पीठ किमान २ तास झाकून ठेवले पाहिजे. या विश्रांतीमुळे रवा फुलतो आणि पीठ घट्ट, गुळगुळीत व मऊ होते.
भटूरे मऊसर येण्यासाठी तेल योग्य तापमानाला असावे. जर तेल जास्त गरम असेल तर भटूरे बाहेरून लाल पण आतून कच्चे राहतील. आणि कमी गरम असेल तर ते तळताना जास्त तेल शोषतील. मध्यम-उच्च आचेवर तळल्यास भटूरे खूप छान फुगतात. भटूरे तळताना हलके दाबले तर ते एकदम गोल, मऊ आणि फुललेले दिसतात.