Beer Storage : फ्रिजमध्ये बिअर किती दिवस चांगली राहते? तज्ज्ञांनी सांगितलेले नियम एकदा वाचाच!

Published : Aug 25, 2026, 02:35 PM IST

फ्रिजमध्ये ठेवलेली बिअर किती दिवस ताजी राहते? उघडलेली आणि न उघडलेली बिअरची बाटली कशी साठवावी आणि बिअर खराब झाली आहे हे कसं ओळखावं? याबद्दलची सगळी माहिती इथे जाणून घ्या.

PREV
16
बिअरची चव किती काळ टिकते?
वीकेंड पार्टी किंवा खास कार्यक्रमांसाठी अनेकजण आधीच बिअरच्या बाटल्या किंवा कॅन आणून फ्रिजमध्ये ठेवतात. पण फ्रिजमध्ये बिअर किती दिवस चांगली राहते आणि तिची मूळ चव कधीपर्यंत टिकते, हे अनेकांना माहीत नसतं.
26
सीलबंद बिअर
जी बिअर सीलबंद आहे, ती फ्रिजमध्ये (सुमारे 2 ते 4 डिग्री सेल्सिअस तापमानात) ठेवल्यास, तिच्या एक्सपायरी डेटनंतरही 6 ते 8 महिने चांगली राहू शकते.
36
जास्त अल्कोहोल असणारी बिअर
डार्क बिअर किंवा जास्त अल्कोहोल असलेली बिअर 1 ते 2 वर्षांपर्यंत खराब होत नाही. पण, कोणतीही रासायनिक प्रक्रिया न केलेली क्राफ्ट बिअर (Craft Beer) असेल, तर ती 2 ते 3 महिन्यांत पिणे चांगले.
46
बाटली उघडल्यानंतर किती काळ टिकते?
एकदा बिअरचा कॅन किंवा बाटली उघडली की, ती फ्रिजमध्ये ठेवली तरी 24 ते 48 तासांच्या (1-2 दिवस) आत प्यावी. बाटली उघडल्यावर हवा (ऑक्सिजन) आत जाते आणि ऑक्सिडेशन होते. यामुळे कार्बोनेशन (फेस आणि गॅस) कमी होतो आणि बिअरची चव कडवट किंवा सपक लागते.
56
उभ्या ठेवा बॉटल्स
बिअरच्या बाटल्या फ्रिजमध्ये आडव्या ठेवण्याऐवजी नेहमी उभ्या (Vertical) ठेवा. यामुळे कॅपच्या भागाला हवा कमी लागते आणि चव खराब होत नाही. तसेच, बाटल्या थेट प्रकाश किंवा सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.
66
अशावेळी बिअर पिण्यायोग्य राहत नाही
बाटली उघडल्यावर जर गॅस किंवा फेस आला नाही, वास आंबट येत असेल किंवा रंग बदललेला दिसला, तर समजून जा की ती बिअर पिण्यायोग्य नाही.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories