Leech Facts : जळू आपल्याला न दुखवता रक्त कसं पिते? टेक्निक वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Published : Nov 08, 2026, 02:49 PM IST

Leech: आपल्या त्वचेला जळू (Leech) चिकटल्यावर आपल्याला वेदना जाणवायच्या आतच ती रक्त प्यायला लागते. जळूने शरीराला चिकटून रक्त पिण्याच्या या पद्धतीमागे विज्ञानाचं एक अत्यंत आश्चर्यकारक सूत्र दडलेलं आहे.

PREV
13
रक्त पिणारे जीव म्हणून कुप्रसिद्ध..

जळू हा शब्द ऐकला की थोडं निगेटिव्ह वाटतं. रक्त पिणारे जीव म्हणून त्यांची थोडी वाईट प्रतिमा आहे. लोक एकमेकांना 'जळूसारखा चिकटलास' म्हणून टोमणेही मारतात. पण ही जळू आहे तरी काय? ती वेदना न होता रक्त कसं पिते? जळूच्या शरीरात दोन प्रकारचे सकर (Suckers) असतात. मागच्या बाजूला असलेला सकर शरीराला त्वचेवर घट्ट धरून ठेवण्यासाठी, म्हणजेच चिकटण्यासाठी उपयोगी पडतो.

पुढच्या बाजूला असलेला ओरल सकर (Oral Sucker) अन्न ओढून घेण्यासाठी काम करतो. वैद्यकीय उपचारांसाठी वापरल्या जाणार्‍या मेडिकल जळूंच्या तोंडात करवतीसारखे तीन छोटे जबडे (Saw-like Jaws) असतात. प्रत्येक जबड्यावर छोटे छोटे दात असतात. जळू त्वचेला चिकटल्यानंतर हे तीन जबडे एकाच वेळी चावा घेतात. म्हणूनच जळू चावल्यावर ती जखम इंग्रजी अक्षर 'Y' सारखी दिसते.

23
रक्त गोठू नये म्हणून काय करतं माहितीये?

जळू आपल्या त्वचेचा चावा घेताना तिच्या लाळेतून एक प्रकारचं भूल देणारं औषध (अनेस्थेशिया) जखमेत सोडते. त्यामुळे त्या भागातील नसा तात्पुरत्या बधीर होतात. म्हणूनच ती चावत असताना आपल्याला अजिबात वेदना होत नाहीत. त्वचा कापणं हे खूप सोपं काम आहे, पण खरं आव्हान आहे ते रक्त गोठू न देण्याचं. मानवी शरीराला जखम झाल्यावर रक्त लगेच गोठण्याचा (Blood Clotting) प्रयत्न करतं.

जर रक्त गोठलं तर जळूला मिळणारं अन्न थांबेल. हे टाळण्यासाठी जळू तिच्या लाळेतून (Saliva) एक शक्तिशाली रासायनिक अस्त्र सोडते. जळूच्या लाळेमध्ये 'हिरुडिन' (Hirudin) नावाचं एक शक्तिशाली अँटी-कोअॅग्युलंट असतं. हे रक्त गोठण्यासाठी महत्त्वाचं असणारं 'थ्रोम्बिन' (Thrombin) नावाचं प्रोटीन ब्लॉक करतं. त्यामुळे जखमेतून रक्त लगेच न गोठता सतत वाहत राहतं.

33
जळू किती रक्त पिते?

जळूच्या लाळेत फक्त हिरुडिनच नाही, तर इतरही काही रासायनिक संयुगे असतात. हे रक्तातील प्लेटलेट्स एकमेकांना चिकटण्यापासून रोखतात आणि रक्तवाहिन्या (Blood Vessels) रुंद (Widen) होण्यासही मदत करतात. हे सर्व मिळून जखमेजवळचा रक्तप्रवाह न थांबण्याची खात्री करतात. त्यानंतर जळू पुढच्या सकरच्या मदतीने दाब (Suction) निर्माण करून रक्त आत ओढून घेते. या प्रक्रियेत तिची पचनसंस्था (Digestive tract) चांगलीच विस्तारते. काही जळू एकाच वेळी त्यांच्या शरीराच्या वजनापेक्षा अनेक पटींनी जास्त रक्त पिऊ शकतात.

जळू वेगळी झाल्यानंतरही

जळू आपल्या शरीरापासून वेगळी झाल्यानंतरही काही काळ जखमेतून रक्त वाहतच राहतं. कारण जळूच्या लाळेतील अँटी-कोअॅग्युलंट रसायने ती निघून गेल्यावरही काम करत राहतात. जळू फक्त रक्तच पीत नाही, तर कापणं, रक्त गोठण्यापासून रोखणं आणि रक्त ओढून घेणं अशा क्लिष्ट प्रक्रिया ती खूप सहज करते. या छोट्याशा जीवात असलेली ही फीडिंग मेकॅनिझम एक अद्भुत बायोलॉजिकल सिस्टीम आहे असं म्हणता येईल.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories