हॉटवाईफिंग ... हा शब्द "हॉटवाईफ" वरून आला आहे. म्हणजेच पतीच्या संमतीने इतर पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवणारी पत्नी. बसला ना धक्का. पण हे खरं आहे. हा ट्रेंड सध्या चर्चेत आला आहे. विदेशाप्रमाणेच भारतातही हे दिसून येत आहे.
नवीन ट्रेंड्स आपण रोज ऐकतो. काही लोक ते फॉलो करतात, काही नाही. हॉटवाईफिंग हा एक नवीन ट्रेंड आहे जो चर्चेत आहे. हॉटवाईफिंग म्हणजे काय आणि तो ट्रेंडिंगमध्ये का आहे हे जाणून घ्या.
28
इतर पुरुषांशी शारीरिक संबंध
हॉटवाईफिंगमध्ये, विवाहित महिला (जिला "हॉटवाईफ" म्हणतात) तिच्या पतीच्या किंवा जोडीदाराच्या संमतीने इतर पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवते. अशा प्रकारच्या संबंधांवर कोणाचाही आक्षेप नसतो. उलट मूक संमतीच दिली जाते. शारीरिक संबंधांची ही जरा क्लिष्ट बाजू आहे.
38
पतीलाही मिळते सूट
इतर पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्याला चक्क पतीच संमती देतो हे भारतीय संस्कृतित जरा धक्कादायक आहे. पण आता हा ट्रेंड भारतातील काही शहरांमध्ये दिसून येतोय. विशेष म्हणजे यात पत्नीप्रमाणेच पतीलाही काही वेळा असे संबंध ठेवण्यासाठी सूट दिली जाते.
एकपत्नीत्व म्हणजे विवाहित जोडपे एकमेकांशीच जवळीक साधतात. हॉटवाईफिंगमध्ये, महिलेला तिच्या मुख्य जोडीदाराशिवाय इतरांशी शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी असते. हे पारंपारिक एकपत्नीत्वाला विरोधाभासी आहे. पण आता कट्टर समजांमध्येही हे रुजताना दिसून येत आहे.
58
उलट प्रोत्साहन देतो
पती किंवा जोडीदाराला या शारीरिक संबंधांची पूर्ण माहिती असते. पण तो आक्षेप घेत नाही. विरोधही करत नाही. उलट प्रोत्साहन देतो. पत्नीला असे संबंध ठेवण्यास सांगणेही किती आव्हानात्मक आहे याचा विचार करुन बघा.
68
दोघांमधील संबंध आणखी दृढ
अनेक जोडप्यांसाठी, हे त्यांच्या लैंगिक जीवनात उत्साह, आत्मविश्वास आणि नवीनता आणण्यास मदत करते. असे मानले जाते की परपुरुषासोबत संबंध ठेवले तर काही दिवसांनी पत्नीला पुन्हा पतीसोबतच्या संबंधांमध्ये एक वेगळा अनुभव मिळतो. त्यानंतर दोघांमधील संबंध आणखी दृढ, घट्ट होतात.
78
पुरेपुर उपभोग घेता येतो
काहींना हे त्यांच्या लैंगिक जीवन आणि भावनिक विकासासाठी चांगले वाटते, तर काहींना हे हेवा, पश्चात्ताप आणि गोंधळात टाकणारे वाटते. पण संमतीने असे संबंध ठेवता येत असतील तर त्याची मजा काही वेगळीच असते. म्हणजेच त्याचा पुरेपुर उपभोग घेता येतो.
88
एकपत्नीत्व कल्पनेला विरोध असलेल्यांसाठी
हॉटवाईफिंग ही वैयक्तिक निवड आहे. ही प्रवृत्ती एकपत्नीत्व न आवडणाऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे आणि जोडप्यांची यामागची स्वतःची कारणे असू शकतात. पण यासाठी दोघांचीही संमती आवश्यक आहे.