
High blood pressure management during menopause : महिलांमध्ये मेनोपॉज होण्याची समस्या सामान्य आहे. काही महिलांमध्ये मेनोपॉजची लक्षणे फार लवकर दिसून येऊ शकतात. तर काहींमध्ये मेनेपॉज फार उशीरा सुरू होतो. खरंतर, मेनोपॉज महिलांमधील अशी स्थिती आहे, ज्यावेळी त्यांच्या शरीरातील एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोनच्या स्तरामध्ये बदल होतो. यामुळे महिलांच्या शरीरात काही बदल झालेले दिसतात. काही महिलांचे वजन वाढले जाते तर काहींना अनियमित मासिक पाळी येते, झोप येण्याची समस्या उद्भवू शकते.अशातच काही महिलांना अशी शंका निर्माण होते की, मेनोपॉजदरम्यान महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढला जातो का याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
उच्च रक्तदाबाचा धोका
आरोग्य तज्ज्ञांनुसार, मेनोपॉजदरम्यान उच्च रक्तदाबाचा धोका वाढला जातो. मेनोपॉजवेळी महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात यामुळेच उच्च रक्तदाब किंवा हाइपरटेन्शनसारख्या समस्यांची जोखीम वाढली जाऊ शकते. यावेळी शरीरातील एस्ट्रोजन आणि प्रोसेस्टेरॉन हार्मोन कमी होऊ लागतात. परिणामी वजन वाढणे, उच्च रक्तदाबासह हृदयरोगासंबंधित समस्या उद्भवल्या जातात.
मेनोपॉज आणि उच्च रक्तदाब यामधील संबंध
मेनोपॉजची स्थिती निर्माण झाल्यानंतर रक्तवाहिन्या कडक होतात. यामुळे वॅस्कुलर रेजिस्टेंस होऊ शकते. या स्थितीत हृदय शरीरातील अन्य अवयवयांपर्यंत रक्त पोहोचवू शकत नाही. यामुळे काही वेळेस उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. हार्मोनमध्ये होणाऱ्या बदलावामुळे उच्च रक्तदाब वाढला जाऊ शकतो. अशातच हाइपरटेन्शनची समस्या वाढली जाते.
मेनोपॉजवेळी उच्च रक्तदाब असा करा कमी
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)