रोज बीट खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात, ते जाणून घेऊया.
पोटॅशियम भरपूर असलेले बीट खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत होते.
कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि भरपूर फायबर असल्यामुळे मधुमेहींनी आहारात बीटचा समावेश करणे चांगले असते.
फायबरने परिपूर्ण असलेले बीट बद्धकोष्ठता रोखण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते.
व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेले बीट रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही फायदेशीर आहे.
अँटीऑक्सिडंट्स भरपूर असलेले बीट नियमित खाणे मेंदूच्या आरोग्यासाठीही चांगले आहे.
बीट हे लोहाचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे नियमितपणे बीट खाल्ल्याने ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय टाळण्यास मदत होते.
बीटमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. तसेच यात फायबरही भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे आहारात बीटचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेले बीट नियमित खाणे त्वचेच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे.
Rameshwar Gavhane