ओठ कोरडे पडून फाटले आहेत? हे सोपे घरगुती उपाय करून पाहा

Published : Oct 07, 2025, 08:17 PM IST

Home Remedies For Dry Lips: ओठ कोरडे पडणे, फाटणे किंवा खडबडीत होणे ही एक सामान्य समस्या आहे, जी अनेकांना त्रास देते. ओठ कोरडे पडण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

PREV
19
ओठ कोरडे पडून फाटले आहेत? हे घरगुती उपाय करून पाहा

ओठ कोरडे पडून फाटण्यापासून वाचण्यासाठी काही सोपे उपाय.

29
शुद्ध तूप

ओठ कोरडे पडू नयेत म्हणून नियमितपणे ओठांना तूप लावून मसाज करणे फायदेशीर ठरते.

39
दुधाची साय

ओठांवर दुधाची साय लावल्याने ओठांमध्ये ओलावा टिकून राहतो आणि कोरडेपणा दूर होतो.

49
कोरफड

ओठांमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कोरफडीचा गर लावून मसाज करणे खूप फायदेशीर आहे.

59
गुलाब जल

गुलाब जल लावल्यानेही ओठांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.

69
शिया बटर

ओठांवर शिया बटर लावल्याने ओठांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.

79
मध

मध एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. त्यामुळे ओठ कोरडे पडू नयेत म्हणून मध लावणे फायदेशीर ठरते.

89
साखर

साखर एक उत्तम स्क्रबर आहे. यासाठी एक चमचा साखरेत ३-४ थेंब खोबरेल तेल आणि अर्धा चमचा मध मिसळून ओठांवर मसाज करा.

99
खोबरेल तेल

ओठांवर खोबरेल तेल लावून मसाज केल्यानेही ओठांचा कोरडेपणा दूर होतो. 

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories