Google Gemini चं नवं AI इमेज एडिटर Nano Banana, तु्म्ही हे सोपे 15 प्रॉम्प्ट्स ट्राय केले का?

Published : Sep 13, 2025, 04:42 PM IST

मुंबई : गूगलने नुकतंच Nano Banana नावाचं एक अत्याधुनिक AI इमेज एडिटर सादर केलं आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते अगदी सहज आपले फोटो 3D मॉडेलमध्ये रूपांतरित करू शकतात. अधिकृत नाव Gemini 2.5 Flash Image असलेले हे साधन Google Gemini App मध्ये उपलब्ध आहे. 

PREV
15
3D फिगरिन्स तयार करू शकता

या फीचरच्या लाँचनंतर अॅपला १० दशलक्षांहून अधिक डाऊनलोड्स मिळाले आहेत. "Nano Banana" टूल त्याच्या वेग आणि अचूकतेमुळे लोकप्रिय ठरत आहे. याच्या मदतीने वापरकर्ते फक्त एका फोटोवर आणि साध्या मजकूर सूचनेवरून 3D फिगरिन्स तयार करू शकतात. आपल्या पाळीव प्राण्याला डिझायनर टॉयमध्ये, स्वतःला फॅन्टसी अवतारमध्ये किंवा वास्तवदर्शी खेळण्यामध्ये रूपांतरित करणं आता अगदी सोपं झालं आहे.

25
१५ सोपे प्रॉम्प्ट्स

गूगलच्या माहितीनुसार, आतापर्यंत या टूलचा वापर करून २०० दशलक्षांहून अधिक प्रतिमा तयार किंवा बदलल्या गेल्या आहेत.

Nano Banana ट्रेंड : फोटोमधून 3D फिगरिन्स तयार करण्यासाठी १५ सोपे प्रॉम्प्ट्स

वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी गूगल AI स्टुडिओमध्ये Nano Banana वापरून फोटोमधून 3D फिगरिन्स बनवण्यासाठी काही सोपे प्रॉम्प्ट्स सुचवले गेले आहेत.

रिअॅलिस्टिक फिगरिन (1/7 स्केल)

कॉम्प्युटर डेस्कवर वास्तवदर्शी पात्र, गोल पारदर्शक अॅक्रिलिक बेससह, टॉय बॉक्सवर मूळ कलाकृती.

प्लश टॉय

गोंडस रूप, मोठं डोकं, साधे कपडे, मऊ फॅब्रिक, साधा बॅकग्राऊंड आणि सौम्य प्रकाशयोजना.

अ‍ॅनिमे फिगरिन

डायनॅमिक पोझ, पारदर्शक अॅक्रिलिक बेस, मंगा-शैलीचा पार्श्वभूमी आणि निऑन लाइटिंग.

35
वाचा पुढील ५ प्रॉम्प्ट्स

सुपरहिरो अॅक्शन फिगर

झगमगणारा केप, कॉमिक-स्टाईल पॅकेजिंगसह डायनॅमिक स्टॅन्स.

3D व्हिडिओ गेम कॅरेक्टर

पिक्सेलेटेड वातावरणात प्लॅटफॉर्मवर उभं पात्र, गेमिंग प्रॉप्ससह.

फोटो-रिअॅलिस्टिक प्राणी फिगरिन

शेल्फवर बसलेलं, छोट्या अॅक्सेसरीजसह (फूड बाउल, टॉयज), चमकदार रंगसंगती.

अंतराळवीर कलेक्टेबल

स्पेससूटमधील पात्र, चंद्रावरच्या बेसवर, आकाशगंगेची पार्श्वभूमी.

पॉप स्टार मॉडेल

मिनी स्टेजवर परफॉर्मन्स, माईक, कॉन्सर्ट लाइट्स आणि म्युझिक नोट डेकोरेशनसह.

45
वाचा आणकी अतिरिक्त ५ प्रॉम्प्ट्स

फँटसी कॅरेक्टर टॉय

तलवार किंवा दंडुका हातात, जादुई जंगलात, लखलखणाऱ्या इफेक्ट्ससह.

बिझनेसमन फिगरिन

सूट-टायमधील पात्र, हातात लॅपटॉप, जवळ पुस्तके.

होलोग्राम मॉडेल

पारदर्शक रेषा, साय-फाय लूक, टेक टेबलवर प्रदर्शित.

स्पोर्ट्स स्टार कलेक्टेबल

जर्सी ड्रेस, सेलिब्रेशन पोझ, मिनी स्टेडियम आणि ट्रॉफी अॅक्सेसरी.

कार्टून-स्टाईल फिगरिन

खेळकर रंग, मोठी बूटं, कॉमिक प्रॉप्स.

55
वाचा आणखी दोन प्रॉम्प्ट्स

पाळीव प्राणी डिझायनर कलेक्टेबल

बॅन्डाना किंवा कॉलर घातलेलं, मजेदार पोझमध्ये, पेट बेड बॅकग्राऊंडवर.

ऐतिहासिक व्यक्तिमत्व मॉडेल

कालसुसंगत पोशाख, जुन्या नकाश्याची पार्श्वभूमी, “लिमिटेड एडिशन” स्टँडवर.

Read more Photos on

Recommended Stories