
मुंबई | प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, १५ मे २०२५ रोजी MCX वायदा बाजारात सोन्याचा दर ९९,३५८ रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकावरून घसरून ९०,८९० रुपये या एक महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे .
या घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारविषयक चर्चांमुळे गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे कमी झाला आहे .
सोन्याच्या दरातील ही मोठी घसरण गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. विशेषतः, लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही योग्य वेळ आहे.
तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या दरातील ही घसरण तात्पुरती असून, भविष्यात दर पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे, सध्याच्या घसरणीचा फायदा घेऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे.