मधुमेही रुग्णांनी आपल्या आहारातून कोणते पदार्थ वगळावेत, याबद्दल जाणून घेऊया.
जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पांढरा ब्रेड रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो. त्यामुळे त्याचे सेवन कमी करा.
साखर असलेले केक, कँडी, चॉकलेट्स यांसारखे बेकरी पदार्थ मधुमेही रुग्णांनी आहारातून वगळणे चांगले आहे.
साखरयुक्त फळांचे रस देखील रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी हे टाळलेलेच बरे.
रेड मीट, प्रक्रिया केलेले पदार्थ इत्यादींमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे हे पदार्थ आहारातून वगळा.
तेलात तळलेले पदार्थ देखील मधुमेही रुग्णांनी आपल्या आहारातून वगळावेत.
जास्त मीठ असलेले पदार्थ खाल्ल्याने केवळ उच्च रक्तदाबच वाढत नाही, तर रक्तातील साखरेच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतो.
Rameshwar Gavhane