Night Habits : रात्री १० नंतर 'या' गोष्टी करताय? मग वेळीच सावध व्हा, चांगल्या आरोग्यासाठी ५ सवयी पाळाच

Published : Jul 30, 2026, 07:42 PM IST
Night Habits

सार

Night Time Good Habits : दिवसभराचा थकवा आणि ताणतणावानंतर शरीराला रात्री आरामाची गरज असते. चांगली झोप शरीराला पुन्हा ऊर्जा देते. पण रात्री १० नंतर नकळतपणे अशा काही गोष्टी करतो, ज्याचा थेट आपल्या आरोग्यावर आणि झोपेवर परिणाम होतो.

मुंबई : आजकाल रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय अनेकांना लागली आहे. कामाचा ताण, मोबाईलचा वापर, टीव्ही पाहणे किंवा सोशल मीडियावर वेळ घालवणे, या कारणांमुळे लोक झोपेकडे दुर्लक्ष करतात. पण रात्री १० नंतर केलेल्या काही गोष्टी नकळतपणे आरोग्यावर वाईट परिणाम करतात. तज्ज्ञांच्या मते, शरीराला विश्रांतीची गरज असताना काही सवयी टाळायला हव्यात. रात्री कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणती काळजी घ्यावी? रात्री १० नंतर या गोष्टी करूच नका.

मोबाईलचा वापर

रात्री १० नंतर मोबाईल वापरण्याची सवय अनेकांमध्ये दिसून येते. झोपण्यापूर्वी व्हिडिओ पाहणं, सोशल मीडिया स्क्रोल करणं किंवा चॅटिंग केल्यामुळे आपला मेंदू अधिक सक्रिय होतो. फोनच्या स्क्रीनमधून येणारा ब्लू लाइट झोपेच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा आणतो. यामुळे झोप न लागणं किंवा मध्येच जाग येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान तासभर मोबाईल दूर ठेवा.

उशिरा जेवण करणं

रात्री उशिरा जेवणं आरोग्यासाठी चांगलं नाही. कामामुळे किंवा इतर कारणांमुळे अनेकजण रात्री खूप उशिरा जेवतात. रात्री उशिरा आणि जड जेवल्यास पचनक्रियेवर परिणाम होतो. यामुळे पोट फुगणं, अस्वस्थ वाटणं आणि झोपेत अडथळा येण्यासारख्या समस्या येऊ शकतात. शक्यतो रात्रीचं जेवण वेळेवर आणि हलकं करा.

कॉफी, चहा पिणं

कॉफी आणि चहामध्ये असलेल्या कॅफीनमुळे शरीर अधिक सतर्क राहतं. विशेषतः रात्रीच्या वेळी यांचं सेवन केल्यास झोप उशिरा येऊ शकते. अपुऱ्या झोपेमुळे दुसऱ्या दिवशी थकवा आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो. तज्ज्ञांच्या मते, रात्री गरम दूध किंवा कॅफीन-फ्री पेय पिणं हा एक चांगला पर्याय आहे.

अतिविचार करणं

दिवसभरात घडलेल्या गोष्टींचा रात्री झोपताना जास्त विचार केल्यास मन शांत राहत नाही. यामुळे झोपायला उशीर होऊ शकतो. झोपण्यापूर्वी पुस्तक वाचणं, शांत संगीत ऐकणं किंवा ध्यान करणं यासारख्या सवयी मन शांत ठेवण्यास मदत करतात.

जास्त व्यायाम करणं टाळा

व्यायाम आरोग्यासाठी चांगला असला तरी, झोपण्यापूर्वी तीव्र व्यायाम केल्यास झोपेत अडथळा येऊ शकतो. सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करणं अधिक योग्य आहे. मात्र, रात्री जेवणानंतर थोडं चालण्याने काहींना फायदा होऊ शकतो. याशिवाय, रात्री घरात तेजस्वी दिवे लावणं, टीव्ही पाहत जागणं आणि रोज झोपण्याची वेळ बदलणं या सवयींमुळेही झोपेचं चक्र बिघडू शकतं. शरीराला एका ठराविक झोपेच्या वेळेची सवय लावणं गरजेचं आहे.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Egg vs Chicken vs Mutton : अंडी, चिकन की मटण... सर्वात जास्त प्रोटीन कशात असतं?
Money Psychology : पैसा माणसाचा विचार कसा बदलतो? सायकॉलॉजी काय सांगते ते पाहा