मुलांचे संगोपन आणि नोकरीचा ताण, वडिलांनी घेतला टेंटमध्ये राहायचा निर्णय

लग्न झाल्यावर आणि मुले झाल्यावर घरात मोठे बदल होतात. विशेषतः आईवडिलांच्या आयुष्यात. पहिल्यांदाच आईवडील होणाऱ्या जोडप्यांची जीवनशैली पूर्णपणे बदलते.

लग्न झाल्यावर आणि मुले झाल्यावर घरात मोठे बदल होतात. विशेषतः आईवडिलांच्या आयुष्यात. पहिल्यांदाच आईवडील होणाऱ्या जोडप्यांची जीवनशैली पूर्णपणे बदलते. बदलांनुसार आईवडील बदलतात हे आपण नेहमीच पाहतो. पण इथे एका वडिलांनी मुलांच्या संगोपनाच्या मानसिक ताणामुळे घर सोडून अंगणात तंबू टाकून राहण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमधील केंब्रिज येथील रहिवासी स्टुअर्ट आणि त्यांची पत्नी क्लोई यांना दोन मुले आहेत. दोन वर्षांचा मुलगा आणि नुकतेच जन्मलेले बाळ. 

नोकरीच्या व्यापात दोन मुलांचे संगोपन करणे खूप कठीण असल्याचे स्टुअर्टचे म्हणणे आहे. नोकरीच्या व्यापात घरातील कामांसोबत मुलांकडे लक्ष देता येत नसल्याचे स्टुअर्ट सांगतात. मुले झाल्यावर आईंना मानसिक ताण येणे सामान्य आहे. पण इथे वडिलांना ताण आला आहे. त्यामुळेच स्टुअर्टने घर सोडून अंगणात तंबू टाकून राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर आपल्यात मानसिकदृष्ट्या खूप बदल झाल्याचे आणि आता नोकरीच्या कामांवर चांगले लक्ष केंद्रित करता येत असल्याचे स्टुअर्ट सांगतात. 

स्टुअर्टच्या मानसिक अडचणी लक्षात घेऊन पत्नी क्लोईने पतीच्या निर्णयाला मान्यता दिली. घराच्या अंगणातच राहत असल्याने मुलांनाही वडिलांना न पाहण्याची समस्या नव्हती. दरम्यान, पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने स्टुअर्टने घर सोडल्याचे परिसरातील लोकांचा समज होता.  

Share this article