महिलांमध्ये युरिनरी इन्फेक्शन ही एक खूप सामान्य आरोग्य समस्या आहे. यावर उपचार शक्य असले तरी, लघवी करताना होणारी जळजळ आणि ओटीपोटात दुखणं खूप त्रासदायक ठरू शकतं. यापासून वाचण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
नेहमी वैयक्तिक स्वच्छता पाळा. यामुळे युरिनरी इन्फेक्शनसारखे संसर्ग टाळता येतात. विशेषतः मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.
26
भरपूर पाणी प्या
भरपूर पाणी प्यायल्याने युरिनरी इन्फेक्शन टाळण्यास मदत होते. तुम्ही जास्त पाणी प्याल, तेव्हा तुम्हाला वारंवार लघवीला लागेल. यामुळे शरीरात जमा झालेले बॅक्टेरिया बाहेर फेकले जातात.
36
सैलसर कपडे वापरा
घट्ट आणि सिंथेटिक अंतर्वस्त्रे उष्णता आणि ओलावा अडवून ठेवतात. यामुळे बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. त्यामुळे नेहमी सुती किंवा सैलसर कपडे आणि अंतर्वस्त्रे वापरा.
अँटीऑक्सिडंट्स, प्रोबायोटिक्स आणि फायबरयुक्त पदार्थ खा. हे पदार्थ तुमच्या आतड्यांच्या आणि मूत्रमार्गाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
56
ही सवय लगेच सोडा!
लघवी लागल्यास ती जास्त वेळ रोखून धरणे टाळा. असं केल्याने मूत्राशयात (Bladder) बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो आणि इन्फेक्शन होऊ शकतं.
66
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
ताप, पाठदुखी किंवा थंडी वाजून येणं ही युरिनरी इन्फेक्शनची लक्षणं असू शकतात. तुम्हाला अशी लक्षणं दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.