Pancreatic Cancer Early Signs: पॅनक्रियाटिक कॅन्सर म्हणजे स्वादुपिंडातील पेशींची अनियंत्रित वाढ. जास्त मद्यपान, धूम्रपान आणि चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे या कॅन्सरचा धोका वाढतो. वेळेवर निदान व उपचार हे जीवन वाचवू शकतात.
कोणत्याही कारणाशिवाय अचानक वजन कमी होणे हे पॅनक्रियाटिक कॅन्सरचे लक्षण असू शकते.
510
कावीळ
कावीळ किंवा त्वचा आणि डोळे पिवळे होणे, ही पॅनक्रियाटिक कॅन्सरची प्रमुख लक्षणे आहेत.
610
मळमळ आणि उलट्या
जेवल्यानंतर लगेच मळमळ आणि उलट्या होणे हे देखील एक लक्षण असू शकते. सतत अपचन होणे, जेवणानंतर पोटात अस्वस्थ वाटणे हे देखील संकेत असू शकतात.
710
शौचाच्या सवयींमध्ये बदल
शौचाच्या सवयींमध्ये बदल, बद्धकोष्ठता आणि शौचाच्या रंगात बदल दिसणे हे पॅनक्रियाटिक कॅन्सरचे लक्षण असू शकते.
810
मधुमेह
काही लोकांमध्ये कोणत्याही कारणाशिवाय अचानक मधुमेह होणे आणि तो नियंत्रणात न येणे, हे पॅनक्रियाटिक कॅन्सरशी संबंधित असू शकते.
910
थकवा
अचानक भूक न लागणे, जास्त थकवा, अशक्तपणा येणे यांसारखी लक्षणे यामुळे दिसू शकतात.
1010
लक्षात ठेवा:
वर दिलेली लक्षणे दिसल्यास स्वतः निदान करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतरच रोगाची खात्री करा.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.