गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर येणाऱ्या प्रकल्पांमध्ये स्वत:च्या राहण्यासाठी असो की गुंतवणूक म्हणून असो, सदनिका खरेदी करण्यासाठी ग्राहक उत्सुक आहेत. घरांच्या किमती वाढत असल्या तरीही ग्राहकांचा हा उत्साह कमी होताना दिसत नाही.
गुढीपाडवा आणि गृहखरेदी असे एक शुभ समीकरण आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि हिंदू नववर्षांचा शुभारंभ होत असल्याने या दिवशी अनेक जण आपल्या घराची स्वप्नपूर्ती करतात. त्यामुळे साहजिकच अनेक बांधकाम व्यावसायिक आपल्या ग्राहकांच्या मागणी आणि गरज लक्षात घेऊन नवे प्रकल्प मोठ्या प्रमाणात दरवर्षी या कालावधीत बाजारात सादर करतात.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर येणाऱ्या प्रकल्पांमध्ये स्वत:च्या राहण्यासाठी असो की गुंतवणूक म्हणून असो,घर खरेदी करण्यासाठी ग्राहक उत्सुक असतात. घरांच्या किमती वाढत असल्या तरीही ग्राहकांचा हा उत्साह कमी होताना दिसत नाही. या ग्राहकवर्गाला आकर्षित करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांसमोर खूप मोठी संधी आहे. पण या नाण्याची दुसरी बाजू अशी की या चोखंदळ ग्राहकवर्गाला खूश करण्यासाठी बांधकामाचा दर्जा उच्च ठेवाव लागतो. दर्जा, किमती आणि ग्राहक समाधान या तीनही पैलूंचा विचार करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना आणि त्यांच्या प्रकल्पांना पसंती मिळेल यात काही शंकाच नाही.
अधिक पर्याय उपलब्ध आहेत :
सध्या रिअल इस्टेट मध्ये मोठ्या प्रमाणात अनेकजण गुंतवणूक म्हणून विचार करतात मात्र अनेकजण स्वतःचे घर खरेदी करण्याचा विचार करत असतात. पण सध्या मोठ्या प्रमाणात विविध प्रकल्प उपलब्ध आहेत. त्यामुळे साहजिक ग्राहकांना ठिकाण,दर्जा आणि किमती यावर अनेक पर्याय असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.
गुढी पाडव्याला विशेष महत्व :
गुढी पाडव्याला काही तरी नवीन सुरु करण्यासाठी ग्रहांची स्थिती अनुकूलता दर्शवते. यामुळे बहुतेक हिंदू कुटुंबे या दिवशी घर विकत घेण्यावर विश्वास ठेवतात कारण मालमत्ता खरेदी करणे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पवित्र क्रिया आहे. म्हणूनच, जर आपण यावर्षी नवीन घर विकत घेण्याची योजना आखत असाल तर, सध्याच्या कमी गृहकर्ज दरासह ग्रहांची स्थिती आणि आर्थिकदृष्ट्या दोन्ही या दिवशी आपल्या बाजूने आहेत.