Diwali 2026 : दिवाळीत पणत्या जास्त वेळ तेवत ठेवायच्या आहेत? मग ही छोटीशी ट्रिक नक्की वापरा

Published : Nov 05, 2026, 02:31 PM IST

दिवाळीत आपण घराबाहेर पणत्या लावतो. पण वाऱ्यामुळे त्या लगेच विझतात. या पणत्या जास्त वेळ तेवत राहाव्यात यासाठी काही सोप्या टिप्स वापरून पाहा.

PREV
13
पणत्या जास्त वेळ तेवत ठेवता येतील

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. या दिवशी आपण अंगण, बाल्कनी आणि गच्चीवर पणत्या लावून घर सजवतो. पण बाहेर पणत्या लावल्यावर थोडा जरी वारा आला तरी त्या विझतात. सारख्या पणत्या लावणं खूप कंटाळवाणं वाटतं. या समस्येवर सोशल मीडियावर एक भन्नाट उपाय व्हायरल होत आहे. महिला नखांना जे नेलपॉलिश लावतात, त्याचा वापर करून पणत्या जास्त वेळ तेवत ठेवता येतात, असं नेटकरी सांगत आहेत.

23
हा उपाय करुन पाहा

या ट्रिकसाठी पणतीत वात आणि तेल टाकण्यापूर्वी एक छोटंसं काम करा. वातीच्या वरच्या टोकाला थोडं नेलपॉलिश लावा. ते सुकल्यानंतर पणतीत तेल ओतून वात पेटवा. नेलपॉलिश लवकर पेट घेतं. यामुळे वात लवकर पेटतेच, शिवाय वाऱ्यातही ती जास्त वेळ टिकून राहते. बाल्कनी किंवा गच्चीवर लावलेल्या पणत्या सारख्या विझू नयेत म्हणून हा उपाय खूप फायदेशीर ठरतो.

33
सुरक्षित ठिकाणी पणत्या ठेवा

पणत्या जास्त वेळ तेवत राहाव्यात यासाठी काही बेसिक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. थेट वारा लागेल अशा ठिकाणी पणत्या न ठेवता त्या कोपऱ्यात ठेवा. वात खूप मोठी किंवा खूप लहान नसावी. पणतीत तेल किंवा तूप पुरेसं असावं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कपडे आणि पडद्यांसारख्या लवकर पेट घेणाऱ्या वस्तूंपासून पणत्या दूर ठेवा. तसेच लहान मुलांचा हात पोहोचणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी पणत्या ठेवा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories