Diwali 2025 : यंदा दिवाळीमध्ये अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केल्याने अनेक फायदे मिळू शकतात. विशेष म्हणजे चार राशिंवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे. जाणून या राशिंबद्दल..
यावर्षी दिवाळीच्या दिवशी न्यायाची देवता शनी वक्री अवस्थेत असेल. असा संयोग क्वचितच घडतो. वृषभ आणि मिथुनसह काही राशींना याचा मोठा फायदा होऊ शकतो. शनीची ही स्थिती अचानक धनलाभ आणि यश देईल.
25
हंस महापुरुष योग
दिवाळीच्या दिवशी सुख आणि सौभाग्य देणारा गुरु ग्रह त्याच्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत असेल. यामुळे 'हंस राजयोग' तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग अमाप संपत्ती, सन्मान आणि यश देतो.
35
बुधादित्य राजयोग
दिवाळीच्या ३ दिवस आधी, १७ ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल आणि तिथे असलेल्या बुध ग्रहासोबत 'बुधादित्य राजयोग' तयार करेल. यामुळे बुद्धिमत्ता, नेतृत्व क्षमता आणि यश प्राप्त होईल.
दिवाळीच्या दिवशी कन्या राशीत शुक्र आणि चंद्राच्या युतीमुळे 'कलात्मक योग' तयार होईल. हा योग नातेसंबंधात आनंद, मनःशांती आणि प्रेम घेऊन येईल.
55
या राशींसाठी दिवाळी अत्यंत शुभ
दिवाळीच्या दिवशी होणारे ग्रह-गोचर ३ राशींच्या लोकांसाठी विशेष शुभ असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, ही दिवाळी वृषभ, सिंह आणि कुंभ राशीसाठी खूप शुभ राहील. या राशींना अचानक धनलाभ आणि प्रगती होऊ शकते.