Life Path Number : तुमच्या जन्मतारखेत दडलंय भविष्याचं रहस्य; अंकशास्त्र काय सांगतं?

Published : Oct 19, 2026, 10:29 PM IST

अंकशास्त्र सांगतं की, तुमच्या जन्मतारखेवरून काढलेला 'लाईफ पाथ नंबर' (Life Path Number) तुमचा स्वभाव, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवतो. हा नंबर कसा काढायचा?

PREV
14
'लाईफ पाथ नंबर'

जन्मतारीख फक्त वय मोजण्यासाठी नसते, तर अंकशास्त्रात तिचं एक वेगळंच महत्त्व आहे. तुमच्या जन्माची तारीख, महिना आणि वर्ष यांची बेरीज करून जो अंक मिळतो, त्याला 'लाईफ पाथ नंबर' (Life Path Number) म्हणतात. या एका नंबरवरून तुमचा स्वभाव, तुमची कौशल्ये आणि आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन समजायला मदत होते, असा अंकशास्त्राचा दावा आहे. मग तुमचा लाईफ पाथ नंबर कोणता आहे? अगदी सोप्या पद्धतीने तो कसा काढायचा?

24
लाईफ पाथ नंबर काढण्यासाठी जन्मतारीख पुरेशी

तुमचा लाईफ पाथ नंबर काढण्यासाठी फक्त तुमची जन्मतारीख पुरेशी आहे. जन्मतारीख, महिना आणि वर्ष यातील सगळ्या अंकांची बेरीज करा आणि शेवटी एकच अंक उरेपर्यंत बेरीज करत राहा. यात साधारणपणे 1 ते 9 अंक वापरतात. पण काही जण 11, 22 आणि 33 या अंकांना 'मास्टर नंबर' मानतात आणि ते तसेच ठेवतात.

उदाहरण 1: 15-08-1998

जन्मतारीख: 15-08-1998

बेरीज: 1 + 5 + 0 + 8 + 1 + 9 + 9 + 8 = 41

त्यानंतर, 4 + 1 = 5.

म्हणजेच, या जन्मतारखेचा लाईफ पाथ नंबर 5 आहे.

उदाहरण 2: 24-11-2001

बेरीज: 2 + 4 + 1 + 1 + 2 + 0 + 0 + 1 = 11.

काही पद्धतींनुसार 11 हा मास्टर नंबर असल्याने तो तसाच ठेवतात. तर काही जण 1 + 1 = 2 अशी बेरीज करतात. तुम्ही कोणती पद्धत मानता, त्यावर हे अवलंबून आहे.

34
प्रत्येक अंकाला एक खास ओळख

अंकशास्त्रात प्रत्येक अंकाला एक खास ओळख दिली आहे. अंक 1 हा नेतृत्व आणि आत्मविश्वासाशी जोडला जातो. अंक 2 सहकार्य आणि भावनिक दृष्टिकोन दाखवतो. अंक 3 कल्पकता आणि संवादाचं प्रतीक आहे. अंक 4 नियोजन आणि शिस्त दर्शवतो, तर अंक 5 बदल आणि स्वातंत्र्याचं प्रतिनिधित्व करतो.

तसंच, अंक 6 कौटुंबिक जबाबदारी, अंक 7 विचार आणि शोध, अंक 8 महत्त्वकांक्षा आणि व्यवस्थापन कौशल्य, तर अंक 9 माणुसकी दर्शवतो, असं अंकशास्त्र सांगतं. अर्थात, हे सगळे अर्थ पारंपारिक समजुतींवर आधारित आहेत.

44
कोणताही वैज्ञानिक आधार नाही

स्वतःचा लाईफ पाथ नंबर काढणं हा एक मजेशीर अनुभव असू शकतो. तुम्ही तुमच्या नंबरचा अर्थ वाचून तो तुमच्या खऱ्या आयुष्याशी किती जुळतोय, हे पाहू शकता. पण लक्षात ठेवा, आयुष्यातील यश किंवा अपयश फक्त एखादा अंक ठरवत नाही. तुमचं शिक्षण, मेहनत, निर्णय घेण्याची क्षमता आणि परिस्थिती या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात.

आता तुमची जन्मतारीख घ्या आणि तुमचा लाईफ पाथ नंबर काढून पाहा! तुमच्या नंबरचा अर्थ तुमच्या स्वभावाशी किती मिळताजुळता आहे, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल. अंकशास्त्राकडे एक विश्वास किंवा मनोरंजनाचा भाग म्हणूनच पाहा; कारण याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories