Dhanteras 2025 : धनतेरस 2025 शनिवारी, 18 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. या दिवशी त्रयोदशी तिथी प्रदोष काळात असेल. पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:16 ते 8:20 पर्यंत आहे. यम दीपदान संध्याकाळी 5:48 ते 7:04 पर्यंत करता येईल.
धनतेरस हा पाच दिवसांच्या दिवाळी सणाचा पहिला दिवस आहे. पूजेसोबतच खरेदीलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी कुबेर, लक्ष्मी आणि धन्वंतरी यांची पूजा केली जाते. सोनं, चांदी, घर, वाहन, भांडी, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या जातात. असं मानतात की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमुळे घरात सुख-समृद्धी येते.
26
धनतेरसमध्ये १३ अंकाचं काय महत्त्व आहे?
धनतेरस हे नाव 'धन' आणि 'तेरस' या शब्दांनी बनले आहे. असं मानलं जातं की, या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू १३ पट अधिक फळ देतात. धनतेरसच्या दिवशी तेरा दिवेही लावले जातात. धार्मिक मान्यतेनुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला, म्हणजेच तेराव्या दिवशी, समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते.
36
२०२५ मध्ये धनतेरस कधी आहे?
पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२:१८ वाजता सुरू होईल आणि १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १:५१ वाजता समाप्त होईल.
वृषभ लग्नात धनतेरस पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. हे एक स्थिर लग्न आहे. या शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने घरात नेहमी धन आणि समृद्धी येते. या वर्षी धनतेरस पूजेचा शुभ मुहूर्त.
56
धनतेरस पूजेचा शुभ मुहूर्त
वृषभ लग्नात धनतेरस पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. हे एक स्थिर लग्न आहे. या शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने घरात नेहमी धन आणि समृद्धी येते. या वर्षी धनतेरस पूजेचा शुभ मुहूर्त.
66
धनतेरसवर सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त
धनतेरसच्या दिवशी सोनं, चांदी आणि पितळ यांसारखे शुभ धातू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. याशिवाय, वाहन, घर, कपडे, दागिने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीही खरेदी केली जाते. या दिवशी झाडू आणि धणेही खरेदी करतात. यावर्षी खरेदीचा शुभ मुहूर्त १८ ऑक्टोबर दुपारी १२:१८ पासून १९ ऑक्टोबर दुपारी १:५१ पर्यंत असेल.