
आज तुमचा धर्म आणि अध्यात्माकडे कल वाढेल. घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ग्रहमान अनुकूल आहे. कौटुंबिक कलह आणि मानसिक तणाव कमी होईल, तरीही काही कारणाने मन अशांत राहू शकतं. तुमची तब्येत चांगली राहील.
या राशीच्या लोकांनी आज कोणत्याही प्रकारच्या आरोप-प्रत्यारोपांपासून दूर राहावं. कोर्ट-कचेरीची प्रकरणं शक्यतो आपापसातच मिटवा. जमीन-जुमल्याशी संबंधित वाद मिटतील. तुमच्या योजना गुप्त ठेवूनच पुढे काम करा. ठरवलेली कामं पूर्ण होतील.
या राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल. तुम्ही कोणत्याही प्रकारचं नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर वेळ अनुकूल आहे. कोणताही निर्णय घेताना आपल्या प्रतिष्ठेची काळजी घ्या. तुम्ही घेतलेल्या निर्णयांचं आणि केलेल्या कामांचं कौतुक होईल.
कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा संवाद वाढेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागतील. कोणालाही जास्त पैसे उधार देऊ नका, नाहीतर आर्थिक नुकसान होऊ शकतं. वादांपासून दूर राहणंच तुमच्यासाठी चांगलं आहे.
तुम्ही प्रेमविवाह करू इच्छित असाल, तर दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. कुटुंबातील वडीलधारी मंडळी किंवा मोठ्या भावांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. सरकारी कामातही पूर्ण सहकार्य मिळेल.
कामाच्या ठिकाणी तुम्ही एखाद्या कटाचा शिकार होऊ शकता. कोणत्याही करारावर सही करण्यापूर्वी नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा. आरोग्यासाठी दिवस अनुकूल राहील. कोर्ट-कचेरीची प्रकरणं आपापसात मिटवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक चणचण भासू शकते, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा.
आज कोणालाही पैसे उधार देऊ नका, नाहीतर ते वेळेवर परत मिळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. मुलांसंबंधी जबाबदाऱ्या पूर्ण होतील. लग्नाबद्दलची बोलणी यशस्वी ठरतील.
मुलांकडून सुख मिळण्याचे योग आहेत. प्रेमप्रकरणात यश मिळू शकतं. आई-वडिलांच्या आरोग्याची चिंता वाटेल. नोकरीत बढती आणि सन्मान वाढेल. तुम्ही सरकारी टेंडरसाठी अर्ज करू शकता. कोणाची तरी मदत केल्याने तुम्हाला समाधान मिळेल.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकतं. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सावध राहावं लागेल. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणापासून स्वतःला वाचवा. तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल. भावनांवर नियंत्रण ठेवून काम केल्यास जास्त यश मिळेल.
आज तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. ऑफिसमध्ये तुम्हाला सहकाऱ्यांच्या मदतीची गरज भासेल, कारण टीमवर्कने केलेल्या कामातच आज यश मिळेल. कुटुंबाचं सहकार्य लाभेल. धनलाभाचे योगही तयार होत आहेत.
आज तुम्हाला घर आणि नोकरी, दोन्ही ठिकाणी तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर तुम्ही अडचणीत येऊ शकता. काम पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. आज गुंतवणूक न करणंच चांगलं राहील. मनोरंजनाच्या कामांमध्ये आजचा दिवस जाईल.
आज तुम्ही जे काही काम कराल, ते पूर्ण उत्साहाने आणि जोशात कराल. तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनच खर्च करावा लागेल, नाहीतर बजेट बिघडू शकतं. दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊन कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा नंतर पश्चात्ताप करावा लागेल.
Disclaimer
या लेखातील माहिती ज्योतिषांनी सांगितलेली आहे. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत.