
Curved Screen Phone : स्मार्टफोनच्या जगात Curved Screen Phones ने गेल्या काही वर्षात मोठी क्रेझ निर्माण केली आहे. स्टायलिश लूक, प्रीमियम फील आणि आधुनिक डिझाइन यामुळे अनेकांना असे फोन खरेदी करण्याची इच्छा होते. मात्र, वक्र (Curved) स्क्रीन केवळ स्टाइलसाठीच चांगली आहे की ती वापरात डोकेदुखीही ठरू शकते? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे अशा फोनच्या खरेदीपूर्वी त्याचे फायदे, तोटे आणि त्याचा वापर आणखी सोपा करणाऱ्या काही ट्रिक्स जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
Curved स्क्रीन फोनचा पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याचा जबरदस्त लूक. स्क्रीनच्या कडा वळलेल्या असल्यामुळे फोन अधिक आकर्षक, स्लीक आणि प्रीमियम दिसतो. पाहणाऱ्यांना तो एक हाय-एंड डिव्हाइस असल्याची अनुभूती देतो. त्यामुळे ज्यांना स्टाइल आणि डिझाइन महत्त्वाचे वाटते, त्यांच्यासाठी अशा फोनचा लूक नक्कीच मोठा फायदा आहे.
वक्र स्क्रीनमुळे कंटेंट पाहताना अधिक इमर्सिव्ह अनुभव मिळतो. व्हिडिओ पाहणे, गेमिंग करणे किंवा फोटो एडिट करणे अधिक नैसर्गिक आणि वाइड व्ह्यूमधून जाणवतं. स्क्रीन बेजल्स दिसत नाहीत किंवा खूप कमी जाणवतात, त्यामुळे चित्रपट किंवा सिरीज पाहताना थिएटरसारखी फील येते. मल्टीमीडिया लव्हर्ससाठी हा मोठा प्लस पॉइंट आहे.
Curved screen फोनमध्ये Edge Panel किंवा Edge Shortcuts सारखे फीचर्स दिले जातात. यातून तुम्ही फेव्हरेट Apps, कॉन्टॅक्ट्स, टूल्स (कॅल्क्युलेटर, स्क्रीनशॉट टूल्स ऍक्सेस करू शकता. यामुळे वेळ वाचतो आणि फोन वापरणे अधिक स्मूथ आणि सोपे होते. Productivity वाढवण्यासाठी हे फीचर्स खूप उपयोगी आहेत.
वक्र काठांमुळे बोट नकळत स्क्रीनवर लागते आणि अनावश्यक टचेस होतात. टायपिंगमध्ये चुका होऊ शकतात किंवा स्क्रोलिंग करताना अनवधानाने काहीतरी प्रेस होण्याची शक्यता वाढते. हे अनेकांना मोठे डोकेदुखीचे कारण ठरते.
Curved स्क्रीन फ्लॅट स्क्रीनपेक्षा अधिक नाजूक असते. खाली पडल्यास फुटण्याची शक्यता जास्त असते. तसेच अशा स्क्रीनचे रिपेअरिंगही खूप महागडे असते. कधी कधी रिपेअरचा खर्च नवीन फोनच्या 40-50% इतका होऊ शकतो.
वक्र काठांमुळे योग्य टेम्पर्ड ग्लास किंवा कवर मिळवणे अवघड होते. अनेक प्रोटेक्टर्स सहज निघून जातात, बबल्स दिसतात किंवा नीट बसत नाहीत. त्यामुळे फोन सुरक्षित ठेवणे एक आव्हान ठरू शकते.
Edge Touch Sensitivity कमी करा, अनावश्यक टच टाळता येतात.
Premium Case वापरा, जो कडा कव्हर करतो.
3D Curved Tempered Glass वापरा, फ्लॅट ग्लास टाळा.
Accidental Touch Protection सेटिंग्समध्ये ऑन करा.
Drop Protection असलेले Back Cover वापरा, ज्याने स्क्रीनवर थेट धक्का बसणे कमी होते.