काही लोकांनी तूप खाण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
• ज्यांना हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे.
• ज्यांना हृदयविकार आहे.
• जे लोक वजन आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
• जे लोक आधीच सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असलेले पदार्थ खातात.
अशा लोकांनी आपल्या प्रकृतीनुसार आहारात किती तूप असावं, यासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं उत्तम.
अमेरिकन हार्ट असोसिएशन (American Heart Association) देखील सॅच्युरेटेड फॅट्स कमी करून त्याऐवजी निरोगी अनसॅच्युरेटेड फॅट्स असलेले पदार्थ निवडण्याचा सल्ला देते.
हेल्दी डाएटमध्ये तुपाचा समावेश कसा करावा?
चपाती, वरण-भात, पालेभाज्या यांसारख्या पदार्थांमध्ये थोडं तूप घातल्याने चव वाढते. पण फक्त तूप खाणं म्हणजे हेल्दी डाएट नाही.
रोजच्या आहारात भाज्या, फळं, कडधान्यं, तृणधान्यं आणि ड्रायफ्रुट्स यांनाही महत्त्व दिलं पाहिजे. त्याचबरोबर, तुम्ही दिवसभरात एकूण किती फॅट्स घेता, याकडेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
गाईचं की म्हशीचं तूप? शेवटी काय निवडावं?
गाईचं किंवा म्हशीचं तूप यापैकी एकच सर्वांसाठी सर्वोत्तम आहे, असं म्हणता येणार नाही. दोन्हीमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात, त्यामुळे ते प्रमाणात खाणंच महत्त्वाचं आहे.
फक्त तुपाचा प्रकार पाहून आरोग्य ठरवता येत नाही. तुम्ही किती तूप खाता, रोजच्या आहारात इतर कोणते फॅट्स घेता आणि तुमची शारीरिक मेहनत किती आहे, या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. हाच खऱ्या अर्थाने निरोगी आहाराचा पाया आहे.