Chilli Powder: आपल्या रोजच्या जेवणात लाल तिखटाचं महत्त्व खूप आहे. अनेक जण बाजारातून तयार लाल तिखट विकत घेण्याऐवजी सुक्या मिरच्या विकत घेऊन त्या गिरणीतून दळून आणतात. मग अशा प्रकारे १० किलो सुक्या लाल मिरचीपासून किती किलो लाल तिखट मिळतं?
१० किलो सुक्या लाल मिरचीपासून किती लाल तिखट तयार होतं?
वरण, भाजी, आमटी, लोणचं.. कोणताही पदार्थ करायचा असला तरी लाल तिखट लागतंच. काही जण जेवणासाठी बाजारातून लाल तिखटाची पाकिटे विकत आणतात, तर काही जण थेट सुक्या लाल मिरच्या आणून त्या गिरणीतून दळून आणतात. पण आपण १० किलो सुक्या लाल मिरच्या दळायला नेल्या, तर तेवढ्याच वजनाचं लाल तिखट मिळतं का? की वजन कमी होतं? मुळात १० किलो सुक्या लाल मिरचीपासून किती किलो लाल तिखट तयार होतं?
26
किती किलो तिखट मिळतं?
साधारणपणे १० किलो सुक्या लाल मिरच्या दळल्यास अंदाजे ७.५ ते ८.५ किलोपर्यंत लाल तिखट मिळतं. हे मिरचीची जात, ओलावा, देठं काढणं, दळण्याची पद्धत यांसारख्या गोष्टींवर अवलंबून असतं. लाल तिखट दळण्यापूर्वी सुक्या मिरच्या स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं. बाजारातून आणलेल्या मिरचीमध्ये धूळ, कचरा, वाळलेली पानं असू शकतात. कधी कधी खराब मिरच्याही त्यात मिसळलेल्या असतात. त्यामुळे आधी मिरच्या तपासून खराब मिरच्या बाजूला काढल्या जातात.
36
देठं काढल्यास किती वजन कमी होतं?
लाल तिखट दळण्यापूर्वी सुक्या मिरच्यांची देठं काढली जातात. काही अंदाजानुसार, सुक्या मिरचीच्या एकूण वजनात देठांचं वजन सरासरी ७ ते १० टक्क्यांपर्यंत असतं. म्हणजे १० किलो सुक्या लाल मिरचीमध्ये सुमारे ७०० ग्रॅम ते १ किलोपर्यंत देठांचं वजन कमी होतं.
साधारणपणे देठं काढलेली मिरची गिरणीत किंवा आधुनिक ग्राइंडिंग मशिनमध्ये टाकून पावडर तयार केली जाते. या प्रक्रियेत मिरचीचे बारीक कण होतात. त्यानंतर गरजेनुसार चाळणीने चाळून बारीक लाल तिखट वेगळं केलं जातं. चाळणीत उरलेले मोठे तुकडे पुन्हा दळले जातात. या प्रक्रियेत यंत्रांना चिकटलेली पावडर, बाहेर उडणारी थोडी धूळ, साफसफाई करताना काढलेली घाण यामुळे थोडं वजन कमी होतं.
56
देठांसकट दळल्यास काय होतं?
काही ठिकाणी लाल तिखट तयार करताना देठं पूर्णपणे न काढता ती मिरचीबरोबरच दळली जातात. असं केल्याने लाल तिखट जास्त मिळतं. पण देठं जास्त प्रमाणात मिसळल्यामुळे लाल तिखटाचा दर्जा, रंग आणि चवीवर परिणाम होतो. त्यामुळे दर्जेदार लाल तिखट तयार करायचं असेल तर मिरची स्वच्छ करून, वाळवून आणि देठं काढून घेणं चांगलं.
66
लाल तिखट जास्त काळ टिकवण्यासाठी काय करावं?
घरी तयार केलेलं लाल तिखट जास्त काळ ताजं ठेवायचं असेल तर काही काळजी घेतली पाहिजे. लाल तिखट हवाबंद आणि स्वच्छ डब्यात साठवून ठेवावं. त्याला ओलावा लागणार नाही याची काळजी घ्यावी. ओल्या चमच्याने तिखट काढू नये. तसंच ते थेट सूर्यप्रकाश आणि उष्णता असेल अशा ठिकाणी ठेवू नये. लाल तिखटात ओलावा जास्त असेल तर बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मिरची व्यवस्थित वाळवून मगच दळावी.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.