चाणक्य नीतीनुसार, मुली फक्त मुलांचं रूप किंवा सौंदर्य पाहून त्यांच्या प्रेमात पडत नाहीत. जोडीदार निवडताना मुली मुलांमधील काही खास गुण पाहतात. ते विशेष गुण कोणते आहेत?
मुलींचं मन जिंकण्यासाठी मुलं काय काय सर्कस करत नाहीत! पण मुली फक्त मुलांचा चेहरा किंवा सौंदर्य पाहून इम्प्रेस होत नाहीत. चाणक्य नीतीनुसार, जोडीदार निवडताना मुली मुलांमध्ये काही खास गुण शोधतात. मुलींना नेमके कोणते गुण आकर्षित करतात आणि त्यांना कशी मुलं आवडतात?
25
मुलींचा आदर करणारी मुलं
आचार्य चाणक्य यांच्या मते, मुली फक्त मुलांचं रूप पाहून आकर्षित होत नाहीत. ज्या मुलांना मुलींचा आदर करता येतो आणि ज्यांना त्यांच्या भावना समजतात, अशी मुलं मुलींना जास्त आवडतात. नात्यात प्रामाणिकपणा आणि विश्वास असणं मुलींसाठी खूप महत्त्वाचं असतं.
चारचौघात मुलींचा सन्मान करणारी आणि त्यांच्या स्वाभिमानाला धक्का न पोहोचवणारी मुलं मुलींना खूप भावतात. अशा मुलांसोबत आपलं आयुष्य सुरक्षित आणि आनंदी राहील, असा विश्वास मुलींना वाटतो. म्हणूनच अशी मुलं कोणतीही विशेष मेहनत न घेता मुलींचं लक्ष वेधून घेतात.
35
स्पष्ट बोलणारी मुलं
चाणक्य नीती सांगते की, मनात एक आणि ओठावर दुसरं नसणारी, म्हणजेच स्पष्ट बोलणारी मुलं मुलींना खूप आवडतात. समोरच्याला खुश करण्यासाठी खोटं बोलण्यापेक्षा, जे सत्य आहे ते प्रामाणिकपणे सांगणाऱ्या मुलांवर मुली लवकर फिदा होतात.
स्पष्ट बोलण्याच्या नावाखाली कठोर न बोलता, समोरच्याला न दुखावता आपली बाजू मांडणाऱ्या मुलांसोबत मुली लवकर कनेक्ट होतात. अशा मुलांवर मुलींचा विश्वास बसतो आणि त्या आपल्या मनातील कोणतीही गोष्ट त्यांच्यासोबत मोकळेपणाने शेअर करू शकतात. इतरांच्या भावनांचा आदर करणारी आणि प्रामाणिक मुलं मुलींना विशेष आवडतात, असं चाणक्य नीती सांगते.
55
रागावर नियंत्रण ठेवणारी मुलं
चाणक्य यांच्या मते, स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणारी मुलं मुलींना खूप आवडतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडचिड करणारी किंवा अति रागवणारी मुलं मुलींना अजिबात आवडत नाहीत. कितीही मोठं संकट आलं तरी शांततेने मार्ग काढणाऱ्या मुलांना मुली पसंती देतात. मुलींच्या अडचणी न कंटाळता ऐकून घेणारी आणि त्यांच्या मनातील गोष्ट न सांगता ओळखणारी मुलं मुलींना लवकर आकर्षित करतात, असं चाणक्य नीती सांगते.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.