Chaitra Navratri 2026 : चैत्र नवरात्रीचा दुसरा दिवस, देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि आरती

Published : Mar 20, 2026, 07:34 AM IST
Chaitra Navratri 2026

सार

Chaitra Navratri 2026 : चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच द्वितीया तिथीला देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. यावर्षी ही तिथी २० मार्च, शुक्रवारी आहे. देवी ब्रह्मचारिणीला तप आणि अध्यात्माची देवी मानलं जातं. तिची पूजा केल्याने घरात सुख-शांती नांदते असं म्हणतात.

Chaitra Navratri 2026 : चैत्र नवरात्रीची सुरुवात १९ मार्च, गुरुवारपासून झाली आहे. २० मार्च रोजी नवरात्रीचा दुसरा दिवस, म्हणजेच द्वितीया तिथी असेल. या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा करण्याची परंपरा आहे. देवी ब्रह्मचारिणी ही तपश्चर्येची देवी मानली जाते. देवी दुर्गेचं हे रूप अत्यंत शांत आणि सौम्य आहे. ती ब्रह्मदेवाची कन्या असल्यामुळे तिला 'ब्रह्मचारिणी' हे नाव मिळालं. चला तर मग, देवी ब्रह्मचारिणीची पूजा पद्धत, मंत्र आणि आरतीबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

२० मार्च २०२६ चे शुभ मुहूर्त

सकाळी ११:०४ ते दुपारी १२:३४ पर्यंत
दुपारी १२:१० ते १२:५८ पर्यंत (अभिजित मुहूर्त)
दुपारी १२:३४ ते ०२:०४ पर्यंत
दुपारी ०२:०४ ते ०३:३४ पर्यंत
सायंकाळी ०६:३३ ते ०८:०३ पर्यंत

देवी ब्रह्मचारिणीची पूजा पद्धत (Devi Brahmacharini Puja Vidhi)

- २० मार्च, शुक्रवारी शुभ मुहूर्तावर घरातल्या एखाद्या स्वच्छ जागी देवी ब्रह्मचारिणीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा.
- देवीला कुंकू लावा, फुलांचा हार घाला आणि शुद्ध तुपाचा दिवा लावा.
- त्यानंतर देवीला अबीर, गुलाल, हळद, जानवं, फळं, नारळ, सुपारी यांसारख्या गोष्टी एक-एक करून अर्पण करा.
- देवी ब्रह्मचारिणीला उसाचा नैवेद्य दाखवा. जर ऊस उपलब्ध नसेल, तर तुम्ही गूळ किंवा साखरेचा नैवेद्यही दाखवू शकता.
- यानंतर देवी ब्रह्मचारिणीची आरती करा. शक्य असल्यास खाली दिलेल्या मंत्राचा १०८ वेळा जप करा-
या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
दधाना कपाभ्यामक्षमालाकमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।

ब्रह्मचारिणी देवीची आरती (Devi Brahmacharini Ki Aarti)

जय अंबे ब्रह्माचारिणी माता। जय चतुरानन प्रिय सुख दाता।
ब्रह्मा जी के मन भाती हो। ज्ञान सभी को सिखलाती हो।
ब्रह्मा मंत्र है जाप तुम्हारा। जिसको जपे सकल संसारा।
जय गायत्री वेद की माता। जो मन निस दिन तुम्हें ध्याता।
कमी कोई रहने न पाए। कोई भी दुख सहने न पाए।
उसकी विरति रहे ठिकाने। जो तेरी महिमा को जाने।
रुद्राक्ष की माला ले कर। जपे जो मंत्र श्रद्धा दे कर।
आलस छोड़ करे गुणगाना। मां तुम उसको सुख पहुंचाना।
ब्रह्माचारिणी तेरो नाम। पूर्ण करो सब मेरे काम।
भक्त तेरे चरणों का पुजारी। रखना लाज मेरी महतारी।

 

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Women Safety: महिलांच्या सुरक्षेसाठी हे कायदेशीर सेल्फ-डिफेन्स टूल्स नक्की जवळ ठेवा
Gardening Tips: घरच्या घरी कोकोपीट बनवा आणि झाडांना करा हिरवीगार