Budha Shukra Yuti : जेव्हा शुक्र आणि बुध ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो. हा योग ज्योतिषशास्त्रात खूप शुभ मानला जातो. जाणून घ्या योगचा कोणाला फायदा होणार.
वृश्चिक राशीत बुध-शुक्राच्या युतीने लक्ष्मी नारायण योग तयार होईल. ऑक्टोबरमध्ये तयार होणाऱ्या या योगामुळे ३ राशींना शुभ फळ मिळेल. त्यांच्या समस्या दूर होतील आणि करिअरमध्ये यश मिळेल.
24
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुध आणि शुक्राची युती फायदेशीर ठरू शकते. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. वरिष्ठांशी संबंध सुधारतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.
34
मकर रास
मकर राशीच्या लोकांनाही याचा फायदा होईल. करिअरमधील जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित कराल. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ राशीच्या लोकांना बुध-शुक्र युतीचा फायदा होऊ शकतो. व्यवसायासाठी हा काळ फायदेशीर ठरेल. संवाद कौशल्य सुधारेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली ऑफर मिळेल.