Goa Travel Guide : कमी बजेटमध्ये गोव्याची सफर! या ५ स्वस्त ठिकाणांना नक्की भेट द्या

Published : Nov 12, 2026, 03:45 PM IST
Goa Travel Guide: Anjuna To Mapusa - 5 Affordable Places To Visit Without Spending Fortune

सार

कमी बजेटमध्ये गोव्याला जाण्याचा विचार करत आहात? चापोरा फोर्टपासून ते अंजुना बीचपर्यंत, खिशाला परवडणाऱ्या गोव्यातील ५ उत्तम ठिकाणांबद्दल जाणून घ्या.

मुंबई : गोवा म्हटलं की आलिशान रिसॉर्ट्स, पार्ट्या आणि नाईटलाइफ आठवतं. पण, गोव्यात कमी खर्चात आणि मोफत करता येतील अशा अनेक गोष्टी आहेत. सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे आणि गजबजलेले बाजार येथे फिरण्याचा आनंद घेता येतो.

गोव्याच्या ट्रिपमध्ये या ५ स्वस्त ठिकाणांचा नक्की समावेश करा

१. चापोरा फोर्ट

इथून ऐतिहासिक आणि निसर्गरम्य किनारपट्टीचे सुंदर दृश्य दिसते. वागातोर बीच आणि चापोरा नदीच्या काठावर हा किल्ला आहे. सूर्यास्ताचे मस्त फोटो काढण्यासाठी आणि आजूबाजूचा निसर्ग पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

२. अंजुना बीच

कमी बजेट असलेल्या पर्यटकांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी कोणतीही एन्ट्री फी नाही, त्यामुळे शांततेत वेळ घालवण्यासाठी हा बीच भारी आहे. खडकाळ किनाऱ्यावर चालण्याचा आनंद घेता येतो. जवळच असलेल्या मार्केटमध्ये स्थानिक हस्तकलेच्या वस्तू, कपडे आणि भेटवस्तू पाहायला मिळतात.

३. फॉनटेनहास (Fontainhas)

पणजीमधील फॉनटेनहास येथे जुनी पोर्तुगीज घरे, वळणदार रस्ते आणि रंगीबेरंगी वातावरण पाहायला मिळते. या रस्त्यांवर फिरताना आणि जुन्या वास्तूंसोबत मस्त फोटो काढता येतात.

४. ओल्ड गोवा

तुम्हाला इतिहासाची आवड असेल, तर ओल्ड गोव्याला नक्की भेट द्या. इथे प्रसिद्ध बॅसिलिका ऑफ बॉम जीझस आणि सी कॅथेड्रल (Se Cathedral) चर्च आहेत.

५. म्हापसा मार्केट

कमी खर्चात स्थानिक संस्कृती आणि खरेदीचा अनुभव घ्यायचा असेल, तर म्हापसा मार्केट हा एक चांगला पर्याय आहे. इथे मसाले, ताजी फळे-भाज्या, गोवन खाद्यपदार्थ, कपडे आणि भेटवस्तू मिळतात. शुक्रवारी इथे जास्त गजबज असते.

टीप: सुट्टीत बजेट कमी ठेवायचे असेल, तर सार्वजनिक वाहतूक वापरा. कॅब किंवा ऑटोपेक्षा बसने प्रवास केल्यास किंवा जवळच्या ठिकाणांवर पायी चालत गेल्यास पैसे वाचतील.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Aluminium Foil : अ‍ॅल्युमिनियम फॉइलची चमकदार बाजू अन्नाला लावायची की खडबडीत? योग्य पद्धत जाणून घ्या
Eye Health Foods : डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी हे 6 पदार्थ नक्की खा