धान्य, कडधान्ये, सुकामेवा आणि बिया आपल्या शरीराला आवश्यक असलेले फायबर आणि इतर पोषक घटक देतात.
सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी तुम्ही तळलेले पदार्थ, जास्त साखरेचे पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्न (प्रोसेस्ड फूड) खाणे टाळले पाहिजे.
तुम्ही जेवणात मूग, कडधान्ये, दूध, दही, पनीर, अंडी, मासे, कमी चरबीयुक्त मांस आणि सोया उत्पादने घ्या. हे पदार्थ स्नायूंची ताकद टिकवून ठेवतात.
लिंबूवर्गीय फळे, पेरू आणि आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. शरीरात कोलेजन तयार करण्यासाठी ही फळे खूप महत्त्वाची असतात.
हाडे आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन डी मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
दूध, दही आणि पनीर आपल्या हाडांचे आणि स्नायूंचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करतात.
सॅल्मन, बांगडा आणि सार्डिन माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर असते. हे मासे सांध्यांमधील सूज आणि वेदना कमी करायला मदत करतात.
Karishma R