Hair Growth : केस गळतीमुळे टेन्शन आलंय? रोज हे एक तेल लावा, केस गळणं थांबेल

Published : Sep 24, 2026, 03:52 PM IST

केस गळायला लागले की अनेक जण टेन्शन घेतात. घाबरून लगेच शाम्पू आणि कंडिशनर बदलतात. पण रोज फक्त ५ मिनिटे काढून केसांना हे खास तेल लावले, तर केस गळती नक्की थांबेल.

PREV
13
Hair Oil

सध्या केस गळणे आणि केस विरळ होणे ही खूप मोठी समस्या बनली आहे. महागडे शाम्पू आणि सीरम वापरूनही फायदा होत नाहीये का? मग केमिकल्सचा वापर न करता घरच्या घरी फक्त ५ मिनिटांत एक उत्तम उपाय तुम्ही करू शकता. एरंडेल तेलाचा (Castor Oil) वापर करून तुम्ही केसांना दाट आणि लांब बनवू शकता. हा सोपा उपाय कसा करायचा ते आपण पाहूया.

23
एरंडेल, खोबरेल, बदामाचे तेल

एका वाटीत दोन चमचे एरंडेल तेल आणि एक चमचा खोबरेल किंवा बदामाचे तेल घ्या. एरंडेल तेल खूप घट्ट असते, त्यामुळे त्यात दुसरे तेल मिसळणे गरजेचे आहे. हे दोन्ही तेल चांगले एकत्र करा. तुम्ही हे तेल थोडे कोमट करूनही घेऊ शकता. आता बोटांनी हे तेल टाळूला आणि केसांच्या मुळांना चांगले लावा. ३० मिनिटांनंतर सौम्य शाम्पूने केस धुवून टाका.

33
गुणकारी तेल

एरंडेल तेलामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्व 'ई' आणि फॅटी ॲसिड्स असतात. हे घटक केसांच्या मुळांना मजबूत करतात. यामुळे केस गळती कमी होते आणि नवीन केस लवकर वाढतात. तसेच डोक्यातील कोंडा कमी होऊन टाळू निरोगी राहतो. बाजारात मिळणाऱ्या महागड्या तेलांवर पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी हा ५ मिनिटांचा नैसर्गिक उपाय नक्की करून पाहा.

Read more Photos on

Recommended Stories