Beauty Tips : फक्त ५ मिनिटांत योग्य स्किन प्रेप, हलका बेस, क्रीम ब्लश, हायलाइटर आणि मिनिमल आय मेकअप वापरून आकर्षक फेस्टिव्ह ग्लो मिळू शकतो. योग्य शेडची लिपस्टिक किंवा लिप टिंट लावल्यास चेहऱ्यावर त्वरित ताजेपणा आणि चमक येते.
सणासुदीच्या काळात सर्वांना स्वतःला आकर्षक, ताजेतवाने आणि ग्लोइंग दिसावं असं वाटतं. मात्र वेळ कमी असताना मेकअपसाठी जास्त कटकट करणे शक्य होत नाही. अशावेळी फक्त ५ मिनिटांत योग्य तंत्राने मेकअप केल्यास चेहऱ्यावर त्वरित फेस्टिव्ह लूक आणता येतो. यासाठी महागड्या प्रॉडक्ट्सची गरज नसून काही बेसिक वस्तूंच्या मदतीने हा ग्लो मिळू शकतो.
26
स्किन प्रेप – फेस्टिव्ह ग्लोसाठी सर्वात महत्त्वाची स्टेप
मेकअप सुरू करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन हलका मॉइश्चरायझर आणि प्रायमर लावा. मॉइश्चरायझर त्वचेला हायड्रेशन देतो, तर प्रायमर मुळे मेकअप अधिक वेळ टिकतो आणि त्वचेचा टेक्स्चर स्मूथ दिसतो. त्वचा कोरडी असेल तर हायड्रेटिंग जेल प्रायमर आणि तेलकट त्वचेसाठी मॅट प्रायमर उत्तम ठरतो. ही स्टेप फक्त ३०–४० सेकंदात पूर्ण होऊन चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो मिळवून देते.
36
हलका बेस
फेस्टिव्ह लूकमध्ये जड बेसची गरज नसते. त्याऐवजी BB/CC क्रीम, टिंटेड मॉइश्चरायझर किंवा हलके फाउंडेशन वापरा. बोटांनी किंवा स्पंजने बेस ब्लेंड करा. यामुळे चेहऱ्यावरील लहान डाग, पिग्मेंटेशन आणि थकवा लपतो. डोळ्याखालील डार्क सर्कल्स खूप असल्यास फक्त तेथे थोडा कन्सीलर लावा. फक्त १–२ मिनिटांत चेहऱ्यावर स्मूथ आणि नॅचरल ग्लो दिसू लागतो.
चेहऱ्यावर ताजेपणा आणण्यासाठी क्रीम ब्लश उत्तम पर्याय आहे. गुलाबी, पीच किंवा कोरल शेड लावल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक लाली दिसते. हे १० सेकंदात ब्लेंड होते. त्यानंतर हायलाइटरचे दोन हलके स्ट्रोक गालांच्या वरच्या भागावर, नाकावर आणि कपिड्स बोवरवर लावा. दिवे आणि फोटोमध्ये हा हायलाइटर सुंदर फेस्टिव्ह ग्लो देतो.
56
डोळ्यांना मिनिमल टच
फक्त काजळ, मस्कारा आणि न्यूट्रल शिमरी आयशॅडोचा एक स्ट्रोक डोळ्यांना त्वरित आकर्षक बनवतो. काजळाने वॉटरलाइन उजळते, मस्कारा पापण्यांना व्हॉल्यूम देतो आणि आयशॅडोचा हलका शिमर डोळ्यांना फेस्टिव्ह टच देतो. या तीन गोष्टींनी केवळ एका मिनिटात डोळ्यांचा लूक पूर्ण होतो.
66
लिप कलर
फेस्टिव्ह लूकमध्ये लिपस्टिक खूप महत्त्वाची असते. रेड, मॅरून, रोज पिंक किंवा न्युड शेड्स उत्तम दिसतात. जर वेळ कमी असेल तर लिप टिंट वापरा ज्यामुळे ओठांना नैसर्गिक रंग आणि ग्लो मिळतो. ओठांच्या बाहेरील भागावर हलका ग्लॉस लावल्यास चेहरा अधिक फ्रेश आणि ग्लॉइंग दिसतो.