आजकाल त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक जण महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात. ब्रँडेड क्रीम्स, सीरम्स, फेसवॉश असूनही अनेकांची तक्रार असते की चेहरा उजळण्याऐवजी अधिकच काळपट, निस्तेज दिसू लागतो. यामागे प्रोडक्ट्सपेक्षा तुमच्या दैनंदिन स्किन केअर सवयी कारणीभूत असू शकतात. नकळत केल्या जाणाऱ्या काही चुका त्वचेचं नैसर्गिक तेज हिरावून घेतात. त्यामुळे महागडे प्रोडक्ट्स वापरूनही अपेक्षित परिणाम दिसत नाहीत.
26
स्किन टाइपनुसार प्रोडक्ट्स न वापरणे
प्रत्येकाची त्वचा वेगळी असते – कोरडी, तेलकट, मिश्र किंवा संवेदनशील. मात्र अनेक जण मित्रांच्या सल्ल्याने किंवा जाहिराती पाहून कोणतेही प्रोडक्ट वापरतात. स्किन टाइपनुसार योग्य प्रोडक्ट न वापरल्यास त्वचेवर रॅशेस, डलनेस आणि काळपटपणा वाढतो. विशेषतः तेलकट त्वचेवर जड क्रीम वापरल्यास पोर्स बंद होतात आणि चेहरा अधिक काळा दिसू लागतो.
36
सनस्क्रीनकडे दुर्लक्ष करणे
महागडी क्रीम्स लावूनही जर तुम्ही सनस्क्रीन वापरत नसाल, तर सगळी मेहनत वाया जाते. सूर्याच्या UV किरणांमुळे टॅनिंग, पिग्मेंटेशन आणि त्वचेचा रंग बदलतो. अनेकांना वाटतं की घराबाहेर कमी जातो म्हणून सनस्क्रीनची गरज नाही, पण ही मोठी चूक आहे. रोज सनस्क्रीन न लावल्यास चेहरा हळूहळू काळपट आणि थकलेला दिसू लागतो.
अधिक प्रोडक्ट्स म्हणजे चांगले परिणाम, असा गैरसमज अनेकांचा असतो. एकाच वेळी अनेक सीरम, क्रीम आणि फेस पॅक वापरल्याने त्वचेवर रासायनिक प्रतिक्रिया होऊ शकते. यामुळे त्वचा संवेदनशील होते आणि तिचा नैसर्गिक ग्लो कमी होतो. साधी आणि योग्य स्किन केअर रूटीन ठेवली नाही, तर चेहरा निस्तेज दिसण्याची शक्यता वाढते.
56
त्वचा स्वच्छ न ठेवणे
दिवसभर धूळ, माती आणि प्रदूषण त्वचेवर साचते. योग्य प्रकारे चेहरा स्वच्छ न केल्यास पोर्समध्ये घाण साठते आणि त्वचा काळपट दिसू लागते. मेकअप काढल्याशिवाय झोपणे ही सुद्धा मोठी चूक आहे. नियमित क्लिन्झिंग न केल्यास महागडी प्रोडक्ट्सही निष्प्रभ ठरतात.
66
चुकीची लाईफस्टाईल आणि डाएट
फक्त बाह्य सौंदर्यप्रसाधनांवर अवलंबून राहून चालत नाही. अपुरी झोप, पाणी कमी पिणे, जंक फूडचे जास्त सेवन आणि ताणतणाव याचा थेट परिणाम चेहऱ्यावर दिसतो. शरीर आतून अस्वस्थ असेल, तर कितीही महागडे प्रोडक्ट्स वापरले तरी चेहरा काळपट आणि थकलेला दिसतो.