ज्वारीच्या भाकरीचे फायदे...
आरोग्याची काळजी घेणाऱ्यांना ज्वारीची भाकरी नेहमीच आवडते. ज्यांना ग्लूटेनचा त्रास आहे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे त्यांच्यासाठी ज्वारी खूप चांगली आहे.
पचायला हलकी: ज्वारीची भाकरी नैसर्गिकरित्या ग्लूटेन-फ्री असते. ती पोटासाठी हलकी असते आणि लवकर पचते. पोट निरोगी राहिल्यावर पोषक घटक शरीराला चांगले मिळतात आणि वजन लवकर कमी होतं.
अँटीऑक्सिडंट्सने भरपूर: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, ज्वारीत पॉलिफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे शरीरातला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि मेटाबोलिझम व्यवस्थित चालतं. यामुळे शरीर कॅलरीज लवकर बर्न करतं.
प्रोटीनचा चांगला स्रोत: स्नायूंसाठी प्रोटीन खूप महत्त्वाचं असतं. ज्वारीच्या भाकरीत प्लांट-बेस्ड प्रोटीन भरपूर असतं. प्रोटीन जास्त घेतल्याने भूक कमी लागते आणि ओव्हरइटिंग टळतं.
कोलेस्ट्रॉल कमी करतं: ज्वारीतलं सोल्युबल फायबर शरीरातलं खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं. यामुळे फॅट्स लवकर बर्न होतात आणि वजन नियंत्रणात राहतं.
वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?
बाजरी आणि ज्वारी, दोन्हीमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे दोन्ही वजन कमी करायला मदत करतात. पण दोन्हीमध्ये थोडा फरक आहे.
बाजरीची भाकरी: यात प्रोटीन आणि खनिजं थोडी जास्त असतात, त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. म्हणून वजन कमी करण्यासाठी बाजरीची भाकरी थोडी जास्त फायदेशीर ठरू शकते.
ज्वारीची भाकरी: ही पचायला खूप हलकी असते. त्यामुळे ज्यांची पचनसंस्था नाजूक आहे, गॅस किंवा अपचनाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी बेस्ट आहे.
जर खरोखर वजन कमी करायचं असेल, तर एकच भाकरी खाण्याऐवजी दोन्ही भाकऱ्या आलटून-पालटून खा. यामुळे हेल्दी पद्धतीने वजन कमी करता येईल.