भारतातल्या एकमेव 'घोस्ट व्हिलेज'बद्दल तुम्हाला माहितीये का? नाव ऐकायला थोडं भीतीदायक वाटत असलं, तरी हे गाव निसर्गाच्या कुशीत अतिशय शांत ठिकाणी वसलेलं आहे. हे गाव नेमकं आहे तरी कुठे आणि त्याचं नाव असं का पडलं? चला जाणून घेऊया.
भटकेगिरीची आवड असणाऱ्यांसाठी उत्तराखंड म्हणजे एक स्वर्गच आहे. इथे फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत. पण तुम्हाला गर्दीपासून दूर शांतता हवी असेल, तर काही खास जागाही इथे आहेत. उत्तराखंडच्या हर्षिल खोऱ्यात 'बगोरी' (Bagori) नावाचं असंच एक सुंदर गाव वसलेलं आहे. लोक याला प्रेमाने 'घोस्ट व्हिलेज' (Ghost Village) म्हणतात. पण या गावाला हे नाव नेमकं का पडलं? आणि इथली खासियत काय आहे? ते आपण पाहूया.
23
याला 'घोस्ट व्हिलेज' का म्हणतात?
'भुतांचं गाव' नाव ऐकून तुम्हाला वाटेल की इथे खरंच भुतं फिरतात, पण तसं अजिबात नाहीये. इथे कोणतीही भीतीदायक गोष्ट नाही. हिवाळ्यात इथलं तापमान खूप खाली जातं आणि प्रचंड बर्फवृष्टी होते. अशा वेळी इथले स्थानिक लोक काही महिन्यांसाठी खालच्या भागात राहायला जातात. त्यामुळे सलग काही महिने या गावात चिटपाखरूही नसतं, गाव पूर्णपणे रिकामं आणि शांत असतं. म्हणूनच याला 'घोस्ट व्हिलेज' हे नाव पडलं.
बगोरी गावाची खासियत
या गावाची आणखी एक ओळख म्हणजे इथली १०० वर्ष जुनी लाकडी घरं. पारंपारिक हिमालयीन शैलीत बांधलेली ही घरं पर्यटकांचं मन जिंकतात. शिवाय, हर्षिल खोरं सफरचंदाच्या बागा आणि प्रसिद्ध 'पहाडी राजमा' (Rajma) साठी खूप लोकप्रिय आहे. इथल्या राजमाला देशभरात वेगळी ओळख मिळाली आहे.
33
इथली जीवनशैली आणि परंपरा खूप वेगळी आहे
हे गाव इंडो-तिबेट सीमेजवळ असल्यामुळे, इथल्या जाद-भोटिया (Jad-Bhotia) समुदायाची जीवनशैली आणि परंपरा खूप वेगळी आहे. त्यांचे पूर्वज प्राचीन इंडो-तिबेट व्यापारी मार्गांशी जोडलेले होते. इथे मिळणाऱ्या लोकरीच्या हस्तकला वस्तू खूप खास असतात. तुम्हाला नैनिताल किंवा मसुरीसारख्या गर्दीच्या ठिकाणांऐवजी निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवायचा असेल, तर उत्तराखंडच्या या बगोरी गावाला तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये नक्की समाविष्ट करा!
कुठे आहे आणि कसं जायचं?
हे सुंदर गाव समुद्रसपाटीपासून सुमारे २,५२० मीटर उंचीवर आहे आणि प्रसिद्ध हर्षिलपासून फक्त १ किलोमीटर अंतरावर आहे. ऋषिकेशवरून उत्तरकाशी मार्गे तुम्ही हर्षिलला पोहोचू शकता. ऋषिकेश ते बगोरी हे अंतर रस्त्याने सुमारे २४० किलोमीटर आहे. तिथे पोहोचायला साधारण साडेसात ते आठ तास लागतात.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.