मुंबई - माणूस कितीही शास्त्रीय आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत झाला तरी काही श्रद्धा अजूनही कायम आहेत. ज्योतिषशास्त्र ही त्यापैकीच एक. चला तर मग आज बाबा वंगा यांनी कोणत्या राशींबद्दल काय सांगितले आहे…
भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वंगा जगभर ओळखल्या जातात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या घटनांची आधीच भविष्यवाणी केली होती. बाबा वंगा यांच्या काही भविष्यवाण्या ज्योतिषशास्त्रीय संचार आणि ग्रहांच्या हालचालींशी संबंधित आहेत असे ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरू मानतात. याचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर होतो. यावरून चार राशींना खूप फायदा होईल असे ज्योतिषी सांगतात. चला तर मग त्या चार राशी कोणत्या ते पाहूया.
25
मेश राशी
मेश राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस खूप खास असतील. बाबा वंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, या काळात मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होतील, नवीन प्रकल्प यशस्वी होतील. व्यवसाय करणाऱ्यांना नफा मिळेल.
35
सिंह राशी
येणारा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ असेल. बाबा वंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, सिंह राशीचे लोक आपल्या करिअरमध्ये मोठे यश मिळवतील. दीर्घकाळापासूनच्या समस्या सुटतील. आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे समाजात मान-सन्मान वाढेल, आर्थिक स्थिती मजबूत होईल.
तूळ राशीच्या लोकांसाठी येणारा काळ नशीबाचा असेल. या राशीच्या लोकांना भाग्य साथ देईल. आतापर्यंत रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ, जुने कर्ज फिटेल. कुटुंबात सुख आणि शांती नांदेल.
55
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खूप चांगला असेल. त्यांना आरोग्य आणि धन दोराही लाभ होतील. जुने आजार बरे होतील. तसेच त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. नफा मिळवण्याचे मार्गही सापडतील. तसेच त्यांना मानसिक शांती मिळेल.