Beauty Tips : सोशल मीडियावरील रिल्स पाहून सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करता? असे रहा सावध

Published : Jul 17, 2025, 04:00 PM IST
5 ayurvedic ingredients to include in your everyday skin care routine

सार

सध्याच्या मॉर्डन युगामध्ये बदलता ट्रेन्ड पाहून काही गोष्टी केल्या जातात. अशातच सोशल मीडियावरील रिल्स पाहून तुम्ही सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करता का? असे करणे त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

मुंबई : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाने आपलं आयुष्य जवळपास व्यापून टाकलं आहे. विशेषतः इंन्स्टाग्राम, युट्यूब शॉर्ट्स आणि फेसबुक रिल्स यांसारख्या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक दररोज सौंदर्यविषयक टिप्स, मेकअप हॅक्स, स्किन केअर रूटीन आणि डायेट ट्रिक्स शेअर करताना दिसतात. हे सगळं पाहून अनेक तरुण-तरुणी आकर्षित होतात आणि त्याच पद्धतीने स्वतःवर प्रयोग करायला लागतात. पण यामागे सत्य कितपत असतं आणि त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात, याचा विचार न करता फक्त "फॉलो" करणे धोकादायक ठरू शकते.

हे लक्षात घ्यायला हवं की, सोशल मीडियावरील सौंदर्य टिप्स सर्वांनाच लागू होत नाहीत. प्रत्येकाची त्वचा, शरीर, हार्मोनल रचना आणि जीवनशैली वेगवेगळी असते. काही लोकांना एखादी कृती उपयोगी पडू शकते, पण तीच कृती दुसऱ्याला त्वचेचा त्रास, पिंपल्स, अ‍ॅलर्जी किंवा केसगळती यासारख्या समस्या निर्माण करू शकते. उदाहरणार्थ, काही रिल्समध्ये लिंबाचा रस थेट चेहऱ्यावर लावण्याचा सल्ला दिला जातो. पण लिंबात असलेले अ‍ॅसिड संवेदनशील त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते.

फिल्टर आणि एडिटिंगमुळे अनेक गोष्टी खऱ्याच वाटतात, पण त्या फक्त आकर्षक वाटण्यासाठीच असतात. एखादी व्यक्ती १० सेकंदाच्या रिलमध्ये टक्कल झाकले, डार्क सर्कल्स गायब केले किंवा स्किन ग्लोइंग केली, असं दाखवलं जातं, पण त्यामागे महिनेभराचे ट्रीटमेंट्स, महागडी उत्पादने, डॉक्टरांचा सल्ला किंवा केवळ अ‍ॅपचे फिल्टर असू शकतात. ही खोटी प्रतिमा सामान्य लोकांना स्वतःच्या शरीराबद्दल न्यूनगंड निर्माण करून देते. त्यामुळेच सोशल मीडियावर दाखवलेलं सौंदर्य खरंच कितपत खरे आहे याचा विचार करणे गरजेचे आहे.

नैसर्गिक सौंदर्य जपण्यावर भर द्या. तुमच्या त्वचेची आणि शरीराची गरज ओळखून, डॉक्टरांचा सल्ला घेऊन सौंदर्य उपचार घ्या. कोणतेही उत्पादन किंवा उपाय त्वचेवर वापरण्यापूर्वी त्याची माहिती तपासा. सोशल मीडियावरून प्रेरणा घेणं काही वाईट नाही, पण अंधानुकरण करणं ही चूक आहे.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

PREV
Read more Articles on

Recommended Stories

सोन्याला टक्कर! २०२६ मध्ये सर्वाधिक ट्रेंडमध्ये राहतील 'हे' ८ इअररिंग्स; फॅशन आयकॉन बनण्यासाठी लगेच पाहा!
रात्री ट्रेन प्रवास करताय?, या ५ महत्त्वाच्या टिप्स तुमच्या प्रवासाचा अनुभव बदलून टाकतील!