
Akshay Tritiya 2025 Gold Buying : यंदा अक्षय्य तृतीयेचा सण 30 एप्रिल, बुधवारी साजरा केला जाणार आहे. या सणाचे महत्त्व अनेक धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे. अक्षय्य तृतीयेला सोन खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी सोन्याची पूजाही केली जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते. जर तुम्ही अक्षय्य तृतीयेला सोन खरेदी करू शकत नसाल, तर घरात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांचीही पूजा करू शकता. या दिवशी केलेल्या पूजा, उपाय केल्याने त्याचे लाभ होतात. याबद्दलच पुढे जाणून घ्या अक्षय्य तृतीयेला सोन्याची पूजा कशी करावी आणि शुभ मुहूर्त…
अक्षय्य तृतीयेला धर्मग्रंथांमध्ये खूप शुभ तिथी मानले जाते. या दिवशी सोना खरेदी करण्याशी संबंधित अनेक मान्यता आहेत. त्यापैकी एक मान्यता अशी आहे की, सतयुगात याच तिथीला कुबेरदेवांनी देवी लक्ष्मीकडे धनाची याचना केली होती, ज्यामुळे प्रसन्न होऊन देवी लक्ष्मीने त्यांना धनाध्यक्ष म्हणजेच धनाचे स्वामी बनवले होते. एक मान्यता अशीही आहे की याच तिथीला आदिगुरू शंकराचार्यांनी कनकधारा स्तोत्राची रचना करून सोन्याचा वर्षाव केला होता. याच कारणामुळे अक्षय्य तृतीयेला सोन खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे.
- अक्षय्य तृतीयेला आखा तीज असेही म्हणतात. या दिवशी खरेदी केलेले सोने घरात सुख-समृद्धी आणते.
- तसेच अक्षय तृतीयेला सोन्याची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होतात.
- जर तुम्ही अक्षय्य तृतीयेला सोना खरेदी करू शकत नसाल तर निराश होऊ नका, तुम्ही घरात ठेवलेल्या सोन्याचीही पूजा करू शकता.
- यासाठी प्रथम सोने किंवा सोन्याचे दागिने गायीच्या कच्च्या दुधात किंवा गंगाजलात बुडवा.
- त्यानंतर एका पाटावर देवी लक्ष्मीच्या प्रतिमेजवळ लाल कापड पसरवून सोने ठेवा.
- प्रथम देवी लक्ष्मीची पूजा करा आणि नंतर सोन्यावर केशर, कुंकू आणि अक्षताही वाहा.
- सोन्याची पूजा करताना 'ॐ श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद महालक्ष्म्यै नम:' या मंत्राचा जप करा.
- त्यानंतर कर्पूरने देवी लक्ष्मी आणि सोन्याच्या दागिन्यांची आरती करा. पूजा झाल्यानंतर पुन्हा दागिने तिजोरीत ठेवा.
- सकाळी 10.47 ते दुपारी 12.24 पर्यंत
- दुपारी 03.36 ते संध्याकाळी 05.13 पर्यंत
- संध्याकाळी 05.13 ते 08:49 पर्यंत
- रात्री 08.13 ते 09.36 पर्यंत
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)