Dussehra Remedies : दसऱ्याच्या दिवशी करा हे 7 उपाय, नोकरी आणि व्यवसायात मिळेल बक्कळ यश

Published : Oct 16, 2026, 07:20 PM IST
Dussehra Remedies : दसऱ्याच्या दिवशी करा हे 7 उपाय, नोकरी आणि व्यवसायात मिळेल बक्कळ यश

सार

दसऱ्याच्या दिवशी काही खास उपाय केल्याने आयुष्यात प्रगतीचे मार्ग खुले होतात. आर्थिक भरभराट होते आणि रखडलेली कामेही मार्गी लागतात. चला तर मग जाणून घेऊया हे प्रभावी उपाय कोणते आहेत.

मुंबई : दसऱ्याच्या दिवशी आपण दुर्गा माता आणि प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेतो. या दिवशी कोणतंही शुभ काम करण्यासाठी विशेष मुहूर्ताची गरज नसते, अशी मान्यता आहे. अशा वेळी दसऱ्याला काही खास उपाय केल्यास आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात. शिवाय, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यश मिळवण्याचे मार्ग खुले होतात. हे उपाय कोणते आहेत, ते आपण पाहूया.

दसऱ्याचे महत्त्व, दसरा नेमका कधी आहे?

हिंदू पंचांगानुसार, आश्विन शुक्ल दशमी तिथी २० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी सुरू होईल. ही तिथी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजून ११ मिनिटांनी संपेल. त्यामुळे उदया तिथीनुसार, दसरा किंवा विजयादशमीचा सण मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी साजरा केला जाईल. कर्नाटकमध्ये मात्र बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी विजयादशमी साजरी केली जाणार आहे.

दसऱ्याच्या दिवशी कोणते उपाय करावेत?

नोकरीत यश मिळवण्यासाठी

तुम्हाला नोकरीत अडचणी येत असतील किंवा तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दुर्गा मातेची पूजा करा. देवीला १० फळे अर्पण करा. त्यानंतर हा प्रसाद गरिबांना वाटून टाका.

प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी

आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी या दिवशी देवीची पूजा करा. पूजेदरम्यान 'ओम विजयायै नमः' या मंत्राचा जप करा. शुभ मुहूर्तावर पूजा करताना हा उपाय नक्की करा. दुर्गा मातेच्या कृपेने तुम्हाला सर्वच क्षेत्रांत यश मिळेल.

कोर्टाच्या फेऱ्यांतून सुटका मिळवण्यासाठी

कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसेल, तर दसऱ्याला शमीच्या झाडाची पूजा करा. या झाडाखाली दिवा लावा. यामुळे सर्व प्रकारच्या कायदेशीर प्रकरणांतून तुमची सुटका होईल.

उत्तम आरोग्यासाठी

आजारपण किंवा मोठं संकट दूर होत नसेल, तर पाण्याने भरलेला एक अखंड नारळ घ्या. हा नारळ तुमच्या शरीरावरून २१ वेळा ओवाळून घ्या. त्यानंतर तो रावण दहनाच्या आगीत टाकून द्या. घरातील सर्व सदस्यांसाठी तुम्ही अशाच प्रकारे नारळ ओवाळू शकता.

धन आणि समृद्धीसाठी

दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी पूर्ण श्रद्धेने लक्ष्मी मातेचे स्मरण करा. त्यानंतर कोणालाही न सांगता एखाद्या मंदिरात जाऊन झाडू दान करा. यामुळे घरात धन आणि समृद्धी वाढते.

आर्थिक प्रगतीसाठी

व्यवसायात फायदा होत नाहीये का? तुम्ही आर्थिक नुकसान सहन करत आहात का? असं असेल तर दसऱ्याच्या दिवसापासून सलग ४३ दिवस कुत्र्याला प्रेमाने बेसनाचे लाडू खाऊ घाला. हा उपाय केल्याने पैशांशी संबंधित सर्व समस्या संपतात, अशी मान्यता आहे.

मोठ्या संकटातून सुटका मिळवण्यासाठी

एखादं मोठं संकट येण्याची शक्यता वाटत असेल किंवा कुटुंब आधीच गंभीर समस्यांमध्ये अडकलं असेल, तर दसऱ्याला पूर्ण श्रद्धेने सुंदरकांडाचे पठण करा. यामुळे सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Washing Machine Tips : वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यावरही स्वच्छ निघत नाहीत? तुम्ही 'ही' चूक तर करत नाही ना?
Employee Wellbeing: एकाच ऑफिसमध्ये प्रत्येकाचा अनुभव वेगळा का असतो?