Sugar Side Effects : तुम्हाला अतिगोड पदार्थ खाण्याची सवय आहे? आरोग्यासंबंधित उद्भवू शकतात हे आजार

Published : Sep 10, 2026, 09:07 AM IST
Sugar Side Effects

सार

जास्त साखर खाणं आरोग्यासाठी खूपच धोकादायक ठरू शकतं. यामुळे डायबिटीज, लठ्ठपणा आणि हृदयरोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात. इतकंच नाही, तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, हाडं कमकुवत होतात आणि दात किडण्याची शक्यता वाढते.

मुंबई : बहुतेक लोकांना गोड खायला खूप आवडतं. त्यामुळे अनेकजण चहा-कॉफीपासून ते मिठाईपर्यंत अनेक पदार्थ आवडीने खातात. पण, गरजेपेक्षा जास्त साखर खाणं आरोग्यासाठी खूपच नुकसानदायक ठरू शकतं. यामुळे डायबिटीजपासून ते दातांच्या समस्येपर्यंत अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तर त्याने आरोग्याला धोका नसतो, पण तीच गोष्ट वारंवार आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. खरं तर, गरजेपेक्षा जास्त साखर खाल्ल्याने शरीरात फॅट्स जमा होतात आणि वजन वाढतं. याशिवाय हाडं आणि केसांच्या समस्याही मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.

जास्त गोड खाण्याचे तोटे-

१) रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम

जास्त साखर खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीवर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे तुम्हाला सर्दी, फ्लू यांसारख्या समस्या सहज होऊ शकतात. त्यामुळे गोड पदार्थ प्रमाणात खाणंच फायद्याचं ठरतं.

२) हाडं कमकुवत होणं

जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने हाडं कमकुवत होऊ शकतात. यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.

३) डायबिटीजचा धोका

जास्त गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांनी तर साखर खाणं टाळावंच.

४) मुरुमांची समस्या

जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले गोड पदार्थ खाल्ल्याने त्वचा तेलकट होऊ शकते आणि मुरुमांसारख्या समस्या वाढू शकतात. याचा त्वचेवर खोलवर परिणाम होतो.

५) लठ्ठपणाची समस्या

साखरेमध्ये भरपूर कॅलरीज आणि फॅट्स असतात, ज्यामुळे वजन वाढतं. यामुळे लठ्ठपणा येण्याची शक्यता खूप वाढते.

६) हृदयविकार

जास्त गोड खाल्ल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, जे हृदयरोगाचं कारण बनतं.

७) दातांचे नुकसान

जास्त साखर खाण्याचा सर्वात मोठा परिणाम दातांवर होतो. यामुळे दातदुखी आणि दात किडण्याची समस्या वेगाने वाढू लागते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Wash Sneakers In Washing Machine : वॉशिंग मशीनमध्ये शूज धुताय? मग या चुका टाळा
Sweet Potato Benefits : रताळे खाण्याचे 7 भन्नाट फायदे