Marriage Tips: साखरपुड्याआधी पार्टनरला हे ५ प्रश्न विचाराच; सिया गोयल केससारखी चूक टाळा!

Published : Jul 12, 2026, 11:47 AM IST
ketan agrawal murder case pune secret marriage whatsapp chat evidence

सार

पुण्यातील सिया गोयल प्रकरणानंतर एक प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय - लग्नाआधी होणाऱ्या पार्टनरला नक्की काय विचारायला हवं? नात्यांमधील तज्ज्ञांनी सांगितलेल्या या ५ गोष्टी लग्नाआधीच क्लिअर केलेल्या बऱ्या.

Pune Murder Case Relationship Lessons: अरेंज मॅरेजमध्ये साखरपुडा (Engagement) झाल्यानंतरचा काळ खूप सुंदर असतो. पण हा वेळ फक्त शॉपिंग, रील्स बनवणं आणि फिरताना 'परफेक्ट कपल' दिसण्यासाठी नसतो. खरंतर, ही एक संधी असते जिथे तुम्ही एकमेकांचे विचार, प्रामाणिकपणा आणि मॅच्युरिटी तपासू शकता. पुण्यातील हाय-प्रोफाइल मर्डर केसने नात्यांबद्दल पुन्हा एकदा अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. जर तुमचाही साखरपुडा झाला असेल किंवा लवकरच लग्न होणार असेल, तर लग्नाआधी तुमच्या पार्टनरला हे ५ प्रश्न नक्की विचारा. कदाचित यापैकी एखादा प्रश्न तुम्हाला भविष्यातील मोठ्या त्रासातून वाचवू शकेल.

तू हे लग्न स्वतःच्या मर्जीने करतोय/करतेय का?

अनेकदा मुलं-मुली फक्त आई-वडिलांच्या आनंदासाठी, सोशल स्टेटस किंवा 'लोक काय म्हणतील' या दबावाखाली येऊन लग्नाला होकार देतात, पण त्यांचं मन या नात्यात नसतं. पुण्यातील केसमध्येही सिया या लग्नामुळे खूश नव्हती. त्यामुळे हा प्रश्न सर्वात बेसिक आणि महत्त्वाचा आहे. 

नात्यांमधील तज्ज्ञांच्या मते, हा प्रश्न विचारणं यासाठीही गरजेचं आहे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला विश्वास वाटेल की ते कोणत्याही भीतीशिवाय किंवा दबावाशिवाय आपलं मत तुमच्यासमोर मांडू शकतात. जबरदस्तीने लादलेलं नातं कधीच आनंद देऊ शकत नाही.

तुझ्या कोणत्या जुन्या नात्याचा काही विषय अपूर्ण राहिला आहे का?

नात्यांमधील तज्ज्ञांच्या मते, प्रत्येकाचा एक भूतकाळ असू शकतो आणि त्यात काहीच गैर नाही. पण अडचण तेव्हा होते, जेव्हा त्या भूतकाळाचा परिणाम तुमच्या भविष्यावर होऊ लागतो. सिया लग्न ठरल्यानंतरही तिच्या पूर्वीच्या प्रियकराच्या सतत संपर्कात होती. हा प्रश्न कोणावर संशय घेण्यासाठी नाही, तर समोरची व्यक्ती भूतकाळातून पूर्णपणे बाहेर आली आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी आहे. नात्याची सुरुवात नेहमीच एका कोऱ्या पाटीवर व्हायला हवी.

लग्नानंतर तुझ्या सगळ्यात मोठ्या अपेक्षा काय आहेत?

लग्नानंतर आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. करिअर, पर्सनल स्पेस, कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्यांबद्दल प्रत्येकाचे स्वतःचे विचार असतात. तज्ज्ञ सांगतात की, अनेकदा लग्नानंतर भांडणं फक्त यासाठी होतात, कारण दोघांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. हा प्रश्न तुम्हाला हे समजून घ्यायला मदत करेल की, तुमचे विचार आणि लाइफस्टाइल एकमेकांशी जुळतात की नाही.

या नात्याबद्दल तुझ्या मनात काही शंका आहे का?

मनात एक छोटीशी शंका असली तरी, ती हळूहळू गैरसमजाचं मोठं रूप घेते. जर पार्टनरला तुमच्या एखाद्या गोष्टीबद्दल संकोच वाटत असेल किंवा ते पूर्णपणे कम्फर्टेबल नसतील, तर ते वेळेत जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांच्या मते, लग्नानंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा लग्नाआधीच शंका दूर करणं हजार पटीने चांगलं आहे. यामुळे पार्टनरला वाटेल की तुम्ही त्यांच्या भावनांची कदर करता.

आपण कोणत्याही समस्येवर मोकळेपणाने बोलू शकतो का?

पुण्यातील मर्डर केसमध्ये संवादाची (Communication) सर्वात मोठी कमतरता होती. जर सियाने तिच्या कुटुंबाला किंवा केतनला स्पष्टपणे सांगितलं असतं की तिला साखरपुडा तोडायचा आहे, तर कदाचित आज एका निरपराध व्यक्तीचा जीव वाचला असता. 

नात्यांमधील तज्ज्ञ सांगतात की, आयुष्यात चढ-उतार येतच राहतात. त्यामुळे कितीही मोठी अडचण आली तरी, तुम्ही दोघंही कोणत्याही भीतीशिवाय किंवा इगोशिवाय एकमेकांशी बोलू शकाल याची खात्री करा. जर संवादाचा मार्ग खुला असेल, तर प्रत्येक समस्येवर तोडगा काढणं शक्य आहे.

 

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स