Marathi

ब्लाउजच्या बाह्यांच्या ७ रॉयल डिझाइन्स, शिवल्यावर विचारतील टेलर कोण

साडी किंवा लेहंग्यावर ब्लाउजचं डिझाइन खूप महत्त्वाचं असतं. त्यातही बाह्यांची स्टाईल तुमचा संपूर्ण लूक बदलू शकते. पाहूया अशाच काही खास डिझाइन्स.
Marathi

ब्लाउज बाह्यांच्या ७ रॉयल डिझाइन्स

प्रत्येकवेळी सारख्याच डिझाइनच्या बाह्या शिवून कंटाळला असाल, नवीन, ट्रेंडी डिझाइन्स ट्राय करा. या बाह्या साडीला डिझायनर लूक देतील. शिवून घ्या ब्लाउजच्या बाह्यांच्या ७ रॉयल डिझाइन्स.

Image credits: Instagram
Marathi

हेवी एम्ब्रॉयडरी स्लीव्हज डिझाइन

हेवी एम्ब्रॉयडरी बाह्यांची डिझाइन नेहमीच ट्रेंडमध्ये असते. या बाह्या इंडो-वेस्टर्न, पारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या साड्यांवर छान दिसते.मोती, लेस लावून या बाह्यांनाआकर्षक बनवू शकता.

Image credits: Instagram
Marathi

एल्बो लेंथ कटआऊट स्लीव्हज डिझाइन

जर कोपरापर्यंत लांब बाह्या हव्या असतील, तर  एल्बो लेंथ मल्टी-कटआऊट स्लीव्हज डिझाइन निवडू शकता. यावर जरी, जरदोजी किंवा थ्रेड एम्ब्रॉयडरी केल्यास ब्लाउजला रॉयल फिनिशिंग मिळते.

Image credits: Instagram
Marathi

फॉलिंग पफ स्लीव्हज ब्लाउज डिझाइन

पफ स्लीव्हजची फॅशन पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आलीय. खांद्यावर हलका फॉलिंग पफ खाली मोत्यांच्या लटकनची लेअरिंग असलेल्या बाह्या ब्लाउजला रॉयल विंटेज लूक देतात. ही डिझाइन खूपच सुंदर दिसते

Image credits: Instagram
Marathi

शिअर नेट स्लीव्हज फ्रिल डिझाइन

तुम्हाला एलिगंट, मॉडर्न लूक हवा असेल, तर नेट-ऑर्गेंझा फॅब्रिकच्या शिअर स्लीव्हज निवडू शकता. मोती, सिक्विन, फ्लोरल एम्ब्रॉयडरीसोबत फ्रिल लेअरिंगची निवडा, ब्लाउजला प्रीमियम लूक मिळतो

Image credits: Instagram
Marathi

हेवी टॅसल्स वर्क शॉर्ट स्लीव्हज

लग्न, रिसेप्शन आणि सणांसाठी हेवी टॅसल्स वर्क असलेली शॉर्ट स्लीव्हज डिझाइन सर्वाधिक पसंत केली जाते. ही डिझाइन हेवी साड्यांवर खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसते.

Image credits: Instagram
Marathi

कटवर्क स्लीव्हज ब्लाउज डिझाइन

सध्या फॅशनमध्ये अशा कटवर्क बाह्या खूप ट्रेंड करत आहेत. यामध्ये बाह्यांवर स्टायलिश लेअरिंग कट्स असतात आणि त्यांच्या बॉर्डरवर सोनेरी मणी किंवा लेसचं काम केलेलं असतं.

Image credits: Instagram
Marathi

प्लेट्स डिझाइन पर्ल लेस स्लीव्ह

ही डिझाइन पार्टी आणि फेस्टिव्ह वेअरसाठी उत्तम आहे. प्लेट्स डिझाइन आणि पर्ल लेस असलेली ही बाह्यांची डिझाइन साध्या ब्लाउजलाही डिझायनर लूक देते. ही डिझाइन तरुणींमध्ये खूप लोकप्रिय आहे

Image credits: Instagram

Hairstyles For Long Hair : श्रुती हासनच्या 7 हेअर स्टाईल्स ट्राय करा

Silver Mangalsutra: महाग सोनं कशाला! चांदीचे हे 7 सुंदर मंगळसूत्र पाहा

Monsoon Fashion: शिफॉन ते कॉटन, पावसाळ्यात ट्राय करा ६ फॅन्सी स्लीव्हलेस कुर्ती

Patola Blouse : पावसाळ्यात कॉटन सिल्क साडी, त्यावर 6 पटोला ब्लाउज