थंडीतील डाएटमध्ये या 5 फूड्सचा करा समावेश, शरीर राहिल आतमधून गरम

थंडीच्या दिवसात शरीर आतमधून गरम राहणे फार महत्वाचे असते. अशातच उष्ण पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यंदाच्या थंडीत डाएटवेळी कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याबद्दल जाणून घेऊया...

Winter Health Tips : थंडीच्या दिवसात ऊन कमी पडण्यासह तापमान थंड असते. यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा समस्या उद्भवल्या जातात. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी केवळ लोकरीचे कपडेच नव्हे तर अशा गोष्टींचे सेवन करावे जेणेकरुन शरीर आतमधूनही गरम राहण्यास मदत होईल. जाणून घेऊया यंदाच्या थंडीत डाएटमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याबद्दल अधिक...

नट्स आणि ड्राय फ्रुट्स
थंडीच्या दिवसात आपल्या डाएटमध्ये बदाम, अंजीरचा समावेश करा. या दोन्हींमध्ये पोषण तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. याशिवायज बदाम आणि अंजीरमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

अळशीच्या बियांचे सेवन करा
थंडीच्या दिवसात शरीर आतमधून गरम राहण्यासाठी अळशीच्या बियांचे सेवन करा. दररोज अर्धा किंवा एक चमचा भाजलेल्या अळशीच्या बियांचे सेवन करा. अथवा अळशीचे लाडू खा. गर्भवती महिलांनी अळशीचे सेवन करणे टाळावे.

गुळाचे सेवन
शरीर आतमधून गरम राहण्यासाठी डाएटमध्ये साखरेएवजी गुळाचा समावेश करा. दररोज थोडं गुळाचे सेवन केल्याने सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून दूर राहू शकता. याशिवाय पचनक्रिया सुधारणे, शरिरात रक्त तयार होण्यासह रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढली जाते.

तीळाचे सेवन
थंडीच्या दिवसात बहुतांशजण तिळाचे लाडू खातात. यामुळे आरोग्याला फायदा होते. तीळात कॅल्शिअम, प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. युरिक अ‍ॅसिडची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी तीळाचे सेवन करावे.

तूप
शुद्ध तूपात फॅटी अ‍ॅसिड पुरेशा प्रमाणात असल्याने शरीराचे तापमान संतुलित राखण्यास मदत होते. थंडीच्या दिवसात दररोज तूपाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा  : 

न मारता किंवा आरडाओरडा न करता, या 7 मार्गांनी मुलांना शिस्त शिकवा

खोटी मैत्रीण ओळखण्याचे ८ संकेत

Share this article