तुमच्या स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू टॉयलेट सीटपेक्षाही जास्त घाणेरड्या आणि जंतूंनी भरलेल्या असतात? याच वस्तूंमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.
आपलं आरोग्य स्वयंपाकघरातून सुरू होतं. पण, आपण ज्या किचनला एकदम स्वच्छ समजतो, तिथल्याच काही वस्तू आजारांचं घर बनल्या आहेत. लोकांना वाटतं की टॉयलेट सीटवर सर्वात जास्त बॅक्टेरिया असतात. पण वैज्ञानिक संशोधनानुसार, आपण रोज वापरत असलेल्या किचनमधील वस्तूंवर टॉयलेट सीटपेक्षा शेकडो पटींनी जास्त जंतू लपलेले असतात.
26
घरात टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असलेल्या वस्तू
किचन स्पंज - भांड्यांच्या स्पंजमध्ये ओलावा जास्त वेळ टिकतो, त्यामुळे त्यावर टॉयलेट सीटपेक्षा तब्बल 2 लाख पट जास्त बॅक्टेरिया असतात.
कटिंग बोर्ड - भाजी किंवा मांस कापण्याच्या बोर्डवरील चिरांमध्ये जंतू अडकतात. हा बोर्ड टॉयलेट सीटपेक्षा 200 पट जास्त बॅक्टेरियांनी भरलेला असतो.
36
किचन टॉवेल
ओले हात पुसण्याच्या किचन टॉवेलवर टॉयलेट सीटपेक्षा 80 पट जास्त जंतू जमा होतात.
नळाचं हँडल - स्वयंपाक करताना आपण घाणेरड्या हातांनी नळाचं हँडल फिरवतो, त्यावर 40 पट जास्त बॅक्टेरिया असतात.
फ्रिजचं हँडल - घरातील सर्वजण रोज वारंवार स्पर्श करत असलेल्या फ्रिजच्या डोअर हँडलवर 20 पट जास्त जंतू राहतात. फक्त घरातच नाही, तर बाहेरही धोका आहे.
शॉपिंग कार्ट हँडल - सुपरमार्केटमध्ये हजारो लोक स्पर्श करत असलेल्या या हँडलवर टॉयलेट सीटपेक्षा 360 पट जास्त बॅक्टेरिया असतात.
एटीएम बटणं - रोज शेकडो लोक वापरत असलेल्या एटीएम कीपॅडवर 100 पट जास्त जंतू असतात.
लिफ्टची बटणं - ऑफिस आणि शॉपिंग मॉलमधील लिफ्टच्या बटणांवर 40 पट जास्त बॅक्टेरिया असतात.
रेस्टॉरंट मेन्यू कार्ड - हॉटेलमधील स्वच्छ न केलेल्या मेन्यू कार्डवर 30 पट जास्त जंतू असतात.
डोअर हँडल्स - सार्वजनिक ठिकाणच्या दरवाजांच्या हँडलवर 20 पट जास्त बॅक्टेरिया जमा होतात.
56
या डोळ्यांना न दिसणाऱ्या जंतूंपासून बचाव कसा करायचा?
स्पंज बदला - भांड्याचा स्पंज किमान आठवड्यातून एकदा तरी नवीन वापरा.
वेगवेगळे कटिंग बोर्ड - कच्चं मांस (चिकन/मटण) कापण्यासाठी एक आणि भाजी-फळांसाठी दुसरा बोर्ड वापरा.
मोबाईल फोन स्वच्छता - आपण दिवसभर हातात धरत असलेला फोन नियमितपणे डिसइन्फेक्टंट वाइप्सने स्वच्छ करा.
टॉवेल बदला - किचन आणि हात पुसण्याचे टॉवेल दर 2-3 दिवसांनी गरम पाण्यात धुवून उन्हात वाळवा.
66
हातांची स्वच्छता
हातांची स्वच्छता - बाहेरून घरी आल्यावर आणि स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी, हात साबणाने किंवा हँडवॉशने किमान 20 सेकंद चांगले धुवा. घर जंतूमुक्त ठेवण्यासाठी रासायनिक उत्पादनांऐवजी सॅनिटायझिंग स्प्रे, डिसइन्फेक्टंट वाइप्स किंवा व्हिनेगर, लिंबाचा रस, टी ट्री ऑइलसारखे नैसर्गिक उपाय वापरा.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.