आपण सिंकचा वापर भांडी धुण्यासाठी, भाज्या, मासे आणि मांस स्वच्छ करण्यासाठी करतो. सततच्या वापरामुळे सिंकची चमक कमी होते आणि त्यावर डाग पडतात. या सोप्या घरगुती टिप्स वापरून तुम्ही सिंक पुन्हा नव्यासारखं चमकवू शकता.
सिंकमधील चिकट घाण आणि हट्टी डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा खूप प्रभावी आहे. बेकिंग सोड्याची पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि सिंकला लावा. थोड्या वेळाने घासून स्वच्छ धुवा.
25
व्हिनेगर
सिंकमध्ये आधी बेकिंग सोडा शिंपडा. त्यानंतर त्यावर व्हिनेगर ओता. एक तासभर ते तसेच राहू द्या आणि मग सिंक चांगले घासून स्वच्छ करा. सिंक एकदम चमकेल.
35
लिंबू
एका कापलेल्या लिंबावर बेकिंग सोडा टाका. आता या लिंबाने सिंक चांगले घासून स्वच्छ करा. यामुळे सिंकवरील डाग निघून जातील आणि ते चमकू लागेल.
सिंक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचाही वापर करू शकता. कोरड्या सिंकवर ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब टाकून मऊ कापडाने चांगले पुसून घ्या. यामुळे सिंकला नवी चमक येते.
55
डिश सोप
जर सिंकवर जास्त घाण किंवा हट्टी डाग नसतील, तर तुम्ही डिश सोपनेही ते सहज स्वच्छ करू शकता. स्पंजवर डिश सोप घेऊन सिंक चांगले घासून पाण्याने धुऊन टाका.