Shopping Mistakes : कपाटात ढिगाने कपडे असले तरी 'मला घालायला कपडेच नाहीत' अशी तक्रार तुम्हीही करता का? मग तुम्ही नक्कीच या ५ चुका करत असाल. या चुका टाळल्या तर तुमचं कपाट नेहमी परफेक्ट राहील.
दुसरे घालतात म्हणून किंवा सध्या ट्रेंडमध्ये आहे म्हणून आपल्याला तो कपडा शोभेल की नाही याचा विचार न करता कपडे खरेदी करू नका. यामुळे कपाट भरेल पण कपडे वापरले जाणार नाहीत. तुम्हाला ज्या कपड्यांमध्ये आत्मविश्वास वाटतो तेच कपडे निवडा.
25
प्रत्येक कार्यक्रमासाठी नवीन कपडे घेणे
सण किंवा कार्यक्रमांसाठी महागडे कपडे खरेदी करून ते एकदाच वापरून ठेवून देणं म्हणजे पैशांचा आणि जागेचा अपव्यय आहे. त्याऐवजी जुन्याच कपड्यांवर नवीन ब्लाउज किंवा ओढणी मॅच करून घालणं हा शहाणपणाचा पर्याय आहे.
35
अयोग्य फिटिंगचे कपडे
घेतलेला कपडा जर तुमच्या शरीराला नीट बसत नसेल, तर तो कितीही सुंदर असला तरी तुम्ही तो घालणार नाही. खूप सैल किंवा खूप घट्ट कपडे तसेच न ठेवता शिंप्याकडून ते फिटिंग करून घ्या. म्हणजे तुम्ही ते कपडे वापरू शकाल.
एखादा रंग आवडतो म्हणून त्याच रंगाचे सर्व कपडे खरेदी करणं थोड्या दिवसांनी कंटाळवाणं वाटू शकतं. वेगवेगळ्या रंगांचे कपडे किंवा वेगवेगळ्या रंगांचे ब्लाउज, ओढण्या बदलून वापरल्याने एक वेगळा आणि आकर्षक लूक मिळतो.
55
इतर गोष्टींसोबत मॅच न होणारे कपडे
एखादा कपडा एकटाच छान दिसतो म्हणून घेतल्यास तो तुमच्याकडच्या इतर कपड्यांसोबत, शूजसोबत किंवा बॅगसोबत मॅच न झाल्यास तो निरुपयोगी ठरतो. काळा, ब्राऊन, राखाडी, क्रीम अशा बेसिक रंगांचे कपडे निवडल्यास ते वेगवेगळ्या कपड्यांसोबत सहज मॅच करता येतात. यात वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.